Buldana: Colored sports events in district sports complex | बुलडाणा: जिल्हा क्रीडा संकुलात रंगल्या क्रीडा स्पर्धा

बुलडाणा: जिल्हा क्रीडा संकुलात रंगल्या क्रीडा स्पर्धा


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक संघटनांच्यावतीने २८ फेब्रुवारीपासून जिल्हा क्रीडा स्पर्धेला सुरूवात झाली आहे. या स्पर्धेमध्ये जिल्ह्याभरातून १४ संघानी सहभाग घेतला. येथील जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर २९ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खोच्या स्पर्धा चांगल्याच रंगल्या.
जिल्हा परिषद अंतर्गत येणारे जिल्ह्यातील सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी २८ फेब्रुवारीपासून क्रीडा व सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येथील जिल्हा क्रीडा संकुल, जिजामाता मैदान व व्यापारी क्रीडा संकुल याठिकाणी क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. जिल्हा क्रीडा संकुल येथे क्रीडा स्पर्धेेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा मनिषा पवार, आ. संयज गायकवाड यांच्याहस्ते पार पडले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्षा कलमताई बुधवत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन एस., प्राथमिक शिक्षणाधिकारी इ. झेड. खान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय चोपडे, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांच्यासह जिल्हा परिषदचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील १३ तालुक्याचे १३ संघ व एक जिल्हा मुख्यालयाचा संघ असे एकूण १४ संघ सहभागी झाले होते. १ मार्च रोजी क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे.

Web Title: Buldana: Colored sports events in district sports complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.