सेल्फीच्या नादात पाय घसरून पडलेला मुलगा नदीत वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 03:17 PM2019-09-28T15:17:59+5:302019-09-28T15:19:49+5:30

सेल्फी काढताना पाय घसरला आणि नदिच्या वेगवान प्रवाहात वाहून गेला

The boy, who slipped on while take selfie, was carried into the river | सेल्फीच्या नादात पाय घसरून पडलेला मुलगा नदीत वाहून गेला

सेल्फीच्या नादात पाय घसरून पडलेला मुलगा नदीत वाहून गेला

googlenewsNext
href='https://www.lokmat.com/topics/khamgaon/'>खामगाव : सुटाळा खुर्द येथील बोर्डी नदीमध्येसेल्फी काढत असतांना तोल जाऊन 15 वर्षीय मुलगा पाण्यात वाहून गेल्याची घटना शनिवारी सकाळी 8 वाजता घडली. मागील 4-5 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्याने नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. सुटाळा खुर्द या गावाजवळ वाहणाऱ्या बोर्डी नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यावर सकाळी 4-5 विद्यार्थी खेळत होते. सेल्फी काढत असतांना हेमंत राजेश जागींड (वय 15) वर्ष याचा तोल सुटुन तो खाली पडला व वाहत गेला. नदीच्या पाण्यात हेमंत वाहून गेल्याची माहिती मित्रांनी दिल्यानंतर गावकरी घटनास्थळी पोहोचले. शोध व बचाव पथकामार्फत त्याचा शोध सुरू आहे.

Web Title: The boy, who slipped on while take selfie, was carried into the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.