दुचाकी अपघातामध्ये दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 11:00 AM2020-05-27T11:00:12+5:302020-05-27T11:00:20+5:30

शेगाव रोडवर दुचाकींच्या झालेल्या दोन अपघातामध्ये दोन जण ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Both died in a two-wheeler accident | दुचाकी अपघातामध्ये दोघांचा मृत्यू

दुचाकी अपघातामध्ये दोघांचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर: मोताळा तालुक्यातील शेलापूर येथे व खामगाव नजीक शेगाव रोडवर दुचाकींच्या झालेल्या दोन अपघातामध्ये दोन जण ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. गेल्या २४ तासात हे अपघात झाले.
पहिली घटना शेलापूर येथे घडली. जुन्या बसस्थानका जवळ दुचाकीला अपघात होऊन मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील दुचाकीवरील दोघांचा रात्री दहा वाजेच्या दरम्यान अपघात झाला. दाताळा येथील प्रकाश नारायण चौधरी (५६), संजय गोविंदा चौधरी(५२) हे दोघे दुचाकीने घराकडे परतीच्या वाटेवर होते. मलकापूर-बुलडाणा रस्त्यावर हा अपघात झाला. दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना मलकापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकाश चौधरी ह्यांना गंभीर मार लागला होता. त्यामुळे त्यांना जळगाव खांदेश येथे हलविण्यात आले. मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
 
शेगाव रोडवरील अपघातात युवक ठार
खामगाव: शेगाव रोडवरील वरखेड येथील पीर बाबाच्या दर्ग्याचे दर्शन करून घरी परतणाऱ्या दुचाकीस्वारास भरधाव टीप्परने जोरदार धडक दिली. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता घडली.मेहबूब नगर मधील रहिवासी शेख वसीम शेख इकबाल हा युवक मंगळवारी दुपारी वरखेड येथील पीर बाबाच्या दर्यावर दर्शनानिमित्त दुचाकीने गेला होता.दर्शन आटोपून तो दुचाकीने घरी परत येत असताना होता. दरम्यान, त्याचवेळी वरखेड फाट्यावरील वळणावर शेगावकडून गौण खनिज घेवून येणाºया भरधाव टिप्पर क्र. एमएच-३०- बीडी २९४४ ने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.

 

Web Title: Both died in a two-wheeler accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.