पलढग धरणातील बोटींनी वेधले पर्यटकांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 11:29 AM2021-02-10T11:29:26+5:302021-02-10T11:29:34+5:30

Paldhag Dam News पलढग धरणात दोन बोटी सुरू करण्यात आल्या असून, या बोटींनी सध्या पर्यटकांचे लक्ष वेधले आहे. 

Boats in Paldhag Dam attract the attention of tourists | पलढग धरणातील बोटींनी वेधले पर्यटकांचे लक्ष

पलढग धरणातील बोटींनी वेधले पर्यटकांचे लक्ष

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : पलढग धरणावर निसर्ग पर्यटन विकास आराखड्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून आहे. या ठिकाणी पर्यटनाचा विकास व्हावा, या उद्देशाने धरणात बोट, लहान मुलांसाठी उद्यानासह खेळण्याचे साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पलढग धरणात दोन बोटी सुरू करण्यात आल्या असून, या बोटींनी सध्या पर्यटकांचे लक्ष वेधले आहे. 
जिल्ह्यातील वैभव असलेल्या व विविध वृक्षप्रजाती, वन्यजीव, डोंगरदऱ्या, तलाव आदी बाबींसह विपुल नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या ज्ञानगंगा अभयारण्याच्या पायथ्याशी पलढग धरण आहे. या धरणात बोटिंगची सुविधा असून, पर्यटकांचा बोटिंगला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.  येथे सध्या दोन बोटिंगची सुविधा आहे. ज्ञानगंगा जंगल सफारीसाठी चिंच फाटा व गोंधनखेड गेटजवळ जिप्सी बुकिंग सेंटर सुरू करण्यात आले आहे. आता जंगल सफारीबरोबरच पर्यटकांना बोटींचा आनंद घेता येणार आहे. दोन्ही बोटी अतिशय उच्च तंत्रज्ञानाने तयार केलेल्या असून, सर्व सुविधांनी सुसज्ज आहेत. प्रशिक्षित चालक बोटी चालवित आहेत, तसेच लाइफ सेव्हिंग जॅकेट सुविधाही येथे उपलब्ध आहे. पर्यटकांनी या बोटींचा, जंगल सफारीसाठी जिप्सीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक वनसंरक्षक व्ही.जी साबळे यांनी केले आहे.

Web Title: Boats in Paldhag Dam attract the attention of tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.