२६६ रूपयांची युरियाची बॅग ३०० ते ३५०रुपयांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 11:15 AM2020-08-11T11:15:57+5:302020-08-11T11:16:54+5:30

एमआरपीमध्ये युरीया खताची विक्री न करता जो शेतकरी जास्त पैसे देईल त्यालाच ‘आॅन’वर युरीयाचे खत देण्यात येत आहे.

A bag of urea of Rs. 266 for Rs. 300 to 350 | २६६ रूपयांची युरियाची बॅग ३०० ते ३५०रुपयांना

२६६ रूपयांची युरियाची बॅग ३०० ते ३५०रुपयांना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : सध्या तालुक्यात युरीया खताचा तुटवडा भासत असून, याचा फायदा कृषि सेवा केंद्र चालक घेत आहेत. शेतकऱ्यांना एमआरपीमध्ये युरीया खताची विक्री न करता जो शेतकरी जास्त पैसे देईल त्यालाच ‘आॅन’वर युरीयाचे खत देण्यात येत आहे.
यावर्षी जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबिन, कपाशीसह अन्य पिकांची पेरणी केली. त्यानंतर नियमित झालेल्या पावसाने सध्या पिके जोमात आहेत. मात्र, सध्या पिकांना खताची गरज आहे. ज्यावेळी पिकांना खताची गरज आहे, त्याचवेळी युरीयाचा तुटवडा निर्माण झाला आहे. कृषि विभाग पिकांना युरीया खत एकदा दिल्यावर पुन्हा देण्याची गरज नसल्याचे सांगत असले तरी शेतकºयांचा मात्र युरीया खत खरेदी करण्याकडे कल आहे. सध्या युरीया खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. युरीया खताची रेक उपलब्ध झाल्यावर ज्या कृषि सेवा केंद्राकडे खत उपलब्ध आहे, त्याच्याकडे शेतकरी गर्दी करीत आहेत. एका शेतकºयाला केवळ दोनच बॅग युरीया खत देण्याचे आदेश कृषि विभागाने दिले आहेत. मात्र, अनेक शेतकºयांना जास्त खत हवे असते. युरीया खताची एक बॅगची किंमत २६६ रूपये आहे. मात्र, ३०० ते ४०० रूपयाला खत विकण्यात येत आहे. शेतकºयांना गरज असल्यामुळे शेतकरी जास्त पैसे देऊन खरेदी करीत आहेत. शेतकºयांनी बिल मागितले असल्यास एमआरपीचेच बिल देण्यात येते. तसेच काही दुकानदार शेतकºयांनी बिल मागितले तर त्यांना खतच देत नाही. जास्त रकमेचे बिल देण्यात येत नाही. त्यामुळे शेतकरी कृषि विभागाकडे तक्रार करीत नाही.


युरीयासोबतच अन्य खताचा आग्रह
युरीया खत एमआरपीमध्येच विकावे लागत असल्याने यामध्ये कृषि केंद्र चालकांना जास्त नफा मिळत नाही. त्यामुळे कृषि सेवा केंद्राचे मालक युरीयासोबतच त्यांना नफा असलेले खत खरेदी करण्याचा आग्रह करीत आहेत. युरीयासोबतच ४४० रूपयांचे सुपर फॉस्पेट, १९- १९ चे १५० रूपयांचे पॅकेट, मायक्रोन्यूट्रीएन्टचे पॅकेट घेण्याचा आग्रह करतात. मायक्रोन्यूट्रीअन्टचे पॅकेज ४०० ते ५०० रूपयांपर्यंत मिळतात. त्यामुळे शेतकºयांना युरीयाची गरज असल्यास त्यांना अतिरिक्त खतही खरेदी करावे लागत आहे.


खामगावला मिळाला ५०० मेट्रीक टन युरीया
राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरकडून २५०० मे.टन खताची रेक खामगाव, मलकापूरला मिळाली. या खताचे सर्वच तालुक्यामध्ये वाटप करण्यात आले. तालुक्याची मागणी ७०० मेट्रिक टन एवढी आहे. त्यापैकी २५० मेट्रिक टन एवढाचा पुरवठा ३० जुलै रोजी झाला. बुधवारी राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझरकडून खताची रेक प्राप्त झाली असून, खामगाव तालुक्यासाठी २५० मे.टन युरिया मिळाला.

Web Title: A bag of urea of Rs. 266 for Rs. 300 to 350

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.