पीकविम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 02:19 PM2020-03-06T14:19:40+5:302020-03-06T14:19:47+5:30

बँकेकडून कर्जखात्यातील रक्कम काढून देण्यास नकार दिल्याने पैशासाठी कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे.

The amount of crop insurance directly into the farmers' loan account! | पीकविम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात!

पीकविम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात!

Next

- योगेश फरपट
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : पिक विम्याची रक्कम शेतकºयाच्या थेट कर्ज खात्यात जमा होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. बँकेकडून कर्जखात्यातील रक्कम काढून देण्यास नकार दिल्याने पैशासाठी कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाने याप्रकाराची दखल घेवून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी होत आहे. यावेळी थेट कंपनीकडून शेतकºयांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम टाकण्यात आली आहे, याप्रकारात बँकेचा दोष नसल्याचे बँक अधिकाºयाचे म्हणणे आहे.
शेगाव तालुक्यातील जलंब येथील शेतकरी अब्दुल्लाह शाह यांचे गट नं. १०८२ मध्ये पिक विम्यापोटी ७ हजार रूपयाची रक्कम बँकेत जमा झाली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या कुटूंबातील खातुनबी अब्दुल्लाह शाह यांचे गट नं. १०८३ मध्ये पिक विम्यापोटी २१ हजार रूपये, जैतुनबी इनायतउल्ला शाह यांच्या गट नं. ९७ मध्ये २४ हजार रूपये तर शहनाज बानो इनायतउल्लाह शाह गट नं. ८७ मध्ये १८ हजार रूपये पिक विम्याची रक्कम जलंब येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत जमा झाली आहे. परंतु सदर शेतकरी बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असता बँकेने विड्रॉल करण्यास नकार दिला.


जिल्ह्यातील शेतकरी सध्या आर्थीक संकटात आहे. अशात शेतकºयाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. पिक विम्याच्या रकमेवर शेतकºयाचाच हक्क आहे. यामुळे शेतकºयाच्या बचतखात्यात ही रक्कम वळती करावी. जेणेकरून त्याचा लाभ संबधित शेतकºयाला मिळू शकेल.
- दिलीप पाटील,
संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, खामगाव.


पिक विम्याची रक्कम बँकेत जमा झाल्याचा मोबाईलवर मॅसेज आला. बँकेत रक्कम काढण्यास गेल्यावर बँकेने रक्कम विड्रॉल करण्यास नकार दिला. तुमचे पैसे कर्ज खात्यात जमा झाले असून ते विड्रॉल करता येत नाही. माझ्या मुलाचे ८ मार्च रोजी लग्न आहे. आता मला आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.
- अब्दुल्लाह शाह तमिज शाह
शेतकरी, जलंब ता. शेगांव

यावेळी संबधित विमा कंपनीमार्फत शेतकºयांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. आमच्या बँकेचा यात काही दोष नाही.
- स्वप्नील पार्थीकर, व्यवस्थापक,
सेंट्रल बँक शाखा जलंब

Web Title: The amount of crop insurance directly into the farmers' loan account!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.