कर्जमाफीसाठी कारागृहात जावून केले आधार प्रमाणिकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 11:11 AM2020-08-12T11:11:53+5:302020-08-12T11:12:26+5:30

कारागृहात बंदी असले तरी कजर्माफी योजनेचे लाभार्थी म्हणून कर्जदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण करीत जिल्हा बँकेने एक वेगळा प्रयत्न केला.

Aadhaar certification done by going to jail for debt waiver | कर्जमाफीसाठी कारागृहात जावून केले आधार प्रमाणिकरण

कर्जमाफीसाठी कारागृहात जावून केले आधार प्रमाणिकरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सलग्न असलेल्या नांदुरा तालुक्यातील दादगाव येथील ग्रामसेवा सहकारी संस्थेचे कर्जदार गोपाळ दीपा तेलंग (रा. दादगाव) हे शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र होते. परंतू ते बुलडाणा कारागृहात एका प्रकरणात शिक्षा भोगत होते. त्यामुळे जिल्हा कारागृह अधीक्षकांची परवानगी घेवून त्यांचे आधार प्रमाणिकरण कारागृहातच करण्यात आले.
नाशिक जिल्ह्यातही यापूर्वी अशाच पद्धतीने कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्याचे आधार प्रमाणिकरण करण्यात आले होते. सहा आॅगस्ट रोजी थेट कारागृहात जावूनच हे प्रमाणिकरण करण्यात आले. हे शेतकरी एका प्रकरणात कारागृहात बंदी असले तरी कजर्माफी योजनेचे लाभार्थी म्हणून कर्जदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण करीत जिल्हा बँकेने एक वेगळा प्रयत्न केला.


३९ सभासदांचे प्रमाणिकरण बाकी
जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेतंर्गत आतापर्यंत २० हजार ८०० शेतकºयांना १२८ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. अद्यापही ३९ शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण बाकी असून तेही लवकरच पुर्णत्वास जाईल, असे जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेतील सुत्रांनी सांगितले.

Web Title: Aadhaar certification done by going to jail for debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.