बुलडाणा जिल्ह्यात ‘आत्मनिर्भर’ पॅकेज अंतर्गत उद्योजकांना ५५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 11:50 AM2020-10-21T11:50:08+5:302020-10-21T11:50:31+5:30

Buldhana District, Industriliast १,५६७ सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगासाठी ५५ कोटी ४३ लाख रुपयांचा बुस्टर डोस देण्यात आला आहे.

55 crore to entrepreneurs in Buldana district under 'Atmanirbhar' package | बुलडाणा जिल्ह्यात ‘आत्मनिर्भर’ पॅकेज अंतर्गत उद्योजकांना ५५ कोटी

बुलडाणा जिल्ह्यात ‘आत्मनिर्भर’ पॅकेज अंतर्गत उद्योजकांना ५५ कोटी

Next

- नीलेश जोशी  

बुलडाणा: कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे उद्योजकांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या केद्र सरकारच्या  २० लाख कोटी रुपयांच्या ‘आत्मनिर्भर’ पॅकेजअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात १,५६७ सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगासाठी ५५ कोटी ४३ लाख रुपयांचा बुस्टर डोस देण्यात आला आहे.
व्यवसाय, उद्योगासाठी कर्ज घेतलेल्या व्यावसायिकांचे २९ फेब्रुवारी २०२० रोजी जेवढे कर्ज बाकी आहे त्याच्या २० टक्के पतपुरवठा विना तारण करण्यात आला आहे. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील २,७५६ व्यावसायिकांना ८८ कोटी २४ लाख रुपयांचा पतपुरवठा करण्याचे उदिष्ठ देण्यात आले होते. त्यापैकी ५७ टक्के व्यावसायिकांना एकूण उदिष्ठाच्या ६३ टक्के पतपुरवठा करण्यात आला आहे. अर्थात बुलडाणा जिल्ह्यात १,५६७ लघु, मध्यम व सुक्ष्म व्यावसायिकांना ५५ कोटी ४३ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तीन वर्षात या कर्जाची व्यावसायिकांना परतफेड करावी लागणार आहे. त्यातही पहिल्या वर्षी व्यावसायिकांना फक्त घेतलेल्या या कर्जापोटी फक्त व्याजच द्यावे लागणार आहे. उर्वरित वर्षात कर्जाचे हप्ते फेडता येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. कोरोना संसर्गाची देशात व राज्यात व्याप्ती वाढल्यानंतर मार्च महिन्याच्या शेवट्या आठवड्यात लॉकडाऊन  पुकारण्यात आला होता. त्यानंतर मे महिन्यात हळूहळू पावले अनलॉकच्या दिशेने पडली. सोबतच ‘मिशन बिगीन अगने’अंतर्गत अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. याच कालावधीत मे महिन्यात केंद्रीय वित्त मंत्रालयाने देशासाठी २० लाख कोटी रुपयांचे ‘आत्मनिर्भर’ पॅकेज घोषित केले होते. त्यानंतर जून महिन्यात त्याची व्याप्ती वाढवून डॉक्टर, वकील, सीएंचाही आत आंतर्भाव करण्यात आला होता. त्यामुळे आत्मनिर्भर पॅकेजला आणखी उभारी मिळण्यास प्रारंभ झाला होता.
बुलडाणा जिल्ह्याचा विचार करता आपतकालीन ईमर्जन्सी क्रेडीट लाईन गॅरन्टी स्कीम अंतर्गत (इसीएलजीएस)प्रामुख्याने हा पतपुरवठा करण्यात आला असून आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गतच तीन लाख कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली होती. त्यातून बुलडाणा जिल्ह्यासाठी ही मदत केल्या गेली आहे. मुद्रा लोण, सुक्ष्म उद्योग, मध्यम व लघु उद्योगातील व्यावसायिकांना याचा लाभ झाला आहे. ३० सप्टेंबर अखरेपर्यंत बुलडाणा जिल्ह्यात ही ५५ कोटी ४३ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यातही काही उद्योजकांना पतपुरवठा करण्यात आला असून जिल्ह्याच्या उदिष्ठामध्ये त्यामुळे वाढ होत असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी दिली. 

Web Title: 55 crore to entrepreneurs in Buldana district under 'Atmanirbhar' package

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.