बुलडाणा जिल्ह्यात नायब तहसीलदारांची २४ पदे रिक्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 04:22 PM2020-11-21T16:22:17+5:302020-11-21T16:22:58+5:30

Buldana district News बुलडाणा जिल्ह्यात सद्यस्थितीमध्ये नायब तहसीलदारांची २४ पदे रिक्त आहेत.

24 posts of Deputy Tehsildar posts are vacant in Buldana district | बुलडाणा जिल्ह्यात नायब तहसीलदारांची २४ पदे रिक्त 

बुलडाणा जिल्ह्यात नायब तहसीलदारांची २४ पदे रिक्त 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गातील पदोन्नती करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात तथा महसूल विभागाचे आयुक्त यांचे कडे १८ नोव्हेंबर रोजी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.                  
बुलडाणा जिल्ह्यात सद्यस्थितीमध्ये नायब तहसीलदारांची २४ पदे रिक्त आहेत. सदर रिक्त पदांमुळे यावर्षी उद्भवलेल्या कोवीड आजाराची परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती, निवडणूक, व दैनंदिन कामकाज करताना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. त्याचा मोठा ताण महसूल प्रशासनावर पडत आहे. असे असतांना अमरावती विभागीय पदोन्नती समितीने अद्याप पर्यंत अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गातील पदोन्नतीचा प्रस्ताव शासनास मान्यतेकरीता पाठवलेला नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अमरावती विभागातील अधिकारी हे पुढील पदोन्नतीमध्ये सेवा जेष्ठता असून सुद्धा ज्येष्ठतेत मागे पडत असून त्यांचा दूरगामी परिणाम पदांच्या कर्मचारी यांच्या पदोन्नतीमध्ये होत आहे. 
यास बुलडाणा जिल्ह्यातील कर्मचारी मोठ्या प्रमाणावर बाधित ठरलेले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण होत आहे. तरी अमरावती विभागातील नायब तहसीलदार संवर्गातील पदोन्नतीच्या मार्गातील अडचणी दूर करून नायब तहसीलदार संवर्गातील पदोन्नती करण्याबाबत संबंधितांना योग्य ते निर्देश देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्याचे  उपाध्यक्ष अजय पिंपरकर, जिल्हा अध्यक्ष संजय टेभीकर, जिल्हा सरचिटणीस किशोर हटकर, व बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय अध्यक्ष नंदकुमार येसकर आदींनी केली आहे.

Web Title: 24 posts of Deputy Tehsildar posts are vacant in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.