पीक नुकसानापोटी १३६ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 02:56 PM2019-11-20T14:56:21+5:302019-11-20T14:56:41+5:30

नुकसानापोटी राज्य शासनाकडून १३६ कोटी १३ लाख ९१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यास प्राप्त झाला आहे.

136 crore fund for crop loss | पीक नुकसानापोटी १३६ कोटींचा निधी

पीक नुकसानापोटी १३६ कोटींचा निधी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: परतीचा पाऊस व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात खरीपाच्या झालेल्या नुकसानापोटी राज्य शासनाकडून १३६ कोटी १३ लाख ९१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यास प्राप्त झाला आहे. दरम्यान, हा नुकसान भरपाईचा हा पहिला हप्ता आहे किंवा आणखी काही टप्प्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणखी नुकसान भरपाई मिळणार आहे का? याबाबत स्पष्टपणे माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
शेतकऱ्यांमध्ये असलेली राज्य शासनाप्रतीची प्रचंड नाराजी पाहता किमानपक्षी हा निधी मिळाल्याचा दिलासा शेतकºयांना मिळाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामाची तयारी करताना शेतकºयांना काही प्रमाणात आर्थिक मदत यामुळे होणार आहे.
जिल्ह्यात परतीच्या व अवकाळी पावसामुळे यंदा खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले होते. जिल्ह्यात तबब्ल ४७८ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. सहा लाख ९० हजार ६०२.५४ हेक्टरवर नुकसान झाले होते. तेराही तालुक्यात खरीपाच्या नुकसानाची व्याप्ती मोठी होती. आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात जवळपास सरासरी ११ दिवस हा परतीचा व अवकाळी पाऊस पडला होता. आॅक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यात आलेल्या क्यार आणि महा चक्रीवादळामुळे देखील जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडून त्याने शेतकºयांचे खरीप पिकांचे आतोनात नुकसान केले होते. २०१४ नंतर प्रथमच जिल्ह्यात २१८ टक्के अवकाळी पाऊस झाला होता. त्यावरून या पावसाने केलेल्या नुकसानाची व्याप्ती समोर यावी. एकट्या मेहकर तालुक्यात पैनगंगा नदीकाठच्या शेतकºयांच्या दीडशे पेक्षा अधिक धान्याच्या सुड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या होत्या तर लोणार तालुक्यात सुड्या वाहून गेल्यामुळे जवळपास पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.
त्या पृष्ठभूमीवर जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाने ४५० पथकांद्वारे अगदी बांधावर जावून शेतकºयांच्या झालेल्या नुकसानाचा पंचनामा केला होता. त्यानंतर जिल्ह्यात झालेल्या या नुकसानाचा अहवाल हा विभागीय आयुक्त आणि पुणे येथील कृषी आयुक्तांना सादर करण्यात आला होता. अमरावती विभागात सर्वाधिक नुकसान हे एकट्या बुलडाणा जिल्ह्यात झाल्याचे खासदार प्रतापर जाधव यांचे म्हणणे आहे. त्या पृष्ठभूमीवर किमान पक्षी मिळालेली ही मदत शेतकºयांसाठी प्रारंभीकदृष्ट्या दिलासादायक म्हणावी लागले.
पावसामुळे झालेल्या नुकसानापोटी जिल्ह्याला १३६ कोटी १३ लक्ष ९१ हजार रुपयांचा निधी शासनाकडून देण्यात आला आहे. ही मदत शेतीपिके व फळपिकांसाठी दोन हेक्टरमर्यादेत देण्यात येत असून शेती पिकांसाठी आठ हजार रुपये हेक्टरी तर बहुवार्षिक (फळपिके) पिकांसाठी १८ हजार रुपये हेक्टरी मिळणार आहे.
सोबतच जमीन महसुलात सुट व शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांच्या पाल्यांना शाळा व महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात माफीची सवलतही जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात बाधीत झालेल्या शेतकºयांची संख्या व नुकसानाची व्याप्ती पाहता त्वरेने मदत मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून शासनाला सादर करण्यात आलेल्या निधीच्या मागणीनुसार शासनस्तरावरून ही मदत मंजूर करण्यात आली आहे. सोबतच ही मदत जिल्हस प्राप्त झाली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे जिल्ह्यात दीड महिन्यात २५ शेतकºयांनी आत्महत्या केल्याचे वास्तव समोर येत असतानाच राज्य शासाने किमान पक्षी ही मदत उपलब्ध केल्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. मात्र शेतकºयांचे नुकसान मोठे असून आणखी मदत शेतकºयांना केली जावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)

१४ लाखांचा जमिन महसूल माफ!
बुलडाणा जिल्ह्यातील शेतकºयांचा जवळपास १४ लाख रुपयांचा सामान्य जमीन महसूल यामुळे माफ झाला आहे. त्याचा शेतकºयांना काही प्रमाणात लाभ होणार आहे. जिल्ह्यात जवळपास साडेपाच लाखांच्या आसपास शेतकरी असून या शेतकºयांकडून दरवर्षी सुमारे २० रुपयांच्या आसपास सामान्य जमीन महसूल जमा करण्यात येत असतो. तो आता जमा केल्या जाणार नाही. २०१२, २०१३, २०१४ दरम्यान सुमारे ११ लाख ते १४ लाखांच्या आसपास सामान्य जमीन महसूल गोळा केल्या जात होता. तो अंदाज पाहता साधारणत: १४ लाखांच्या आसपास जिल्ह्यातील शेतकºयांचा हा जमीन महसूल माफ झाला आहे. सोबतच शेतकºयांच्या पाल्यांना शाळा, महाविद्यालयातील परीक्षा शुल्कही माफ करण्यात आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title: 136 crore fund for crop loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.