सीनियर्सच्या अभिनयामुळे यंगस्टर्सची पिछेहाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 11:59 AM2018-11-28T11:59:30+5:302018-11-28T12:01:13+5:30

आपण फक्त चित्रपटाच्या कंटेंटनेच चकित झालो नाही, तर काही मोठ्या चित्रपटांनीही बॉक्स आॅफिसवर चमत्कार केलेत. शिवाय एकीकडे कमी बजेटच्या चित्रपटांनी बक्कळ कमाई केली तर दुसरीकडे काही सीनियर अ‍ॅक्टर्सनेही दमदार परफॉर्मन्स दिले.

Young actors forced to act | सीनियर्सच्या अभिनयामुळे यंगस्टर्सची पिछेहाट!

सीनियर्सच्या अभिनयामुळे यंगस्टर्सची पिछेहाट!

googlenewsNext

-रवींद्र मोरे 

यंदाचे वर्ष बॉलिवूडसाठी खूपच उत्कृष्ठ ठरले. आपण फक्त चित्रपटाच्या कंटेंटनेच चकित झालो नाही, तर काही मोठ्या चित्रपटांनीही बॉक्स आॅफिसवर चमत्कार केलेत. शिवाय एकीकडे कमी बजेटच्या चित्रपटांनी बक्कळ कमाई केली तर दुसरीकडे काही सीनियर अ‍ॅक्टर्सनेही दमदार परफॉर्मन्स दिले. आज आपण अशाच काही स्टार्सविषयी जाणून घेऊया ज्यांनी यंगस्टार्सची पीछेहाट केली.

 * ऋषी कपूर
ऋषी कपूर यांनी आपणास ‘मुल्क’ चित्रपटातील जबरदस्त परफॉर्मन्सने चकितच केले होते. त्यांनी यात एक माजी वकील मुराद अलीची भूमिका साकारली होती, जे अत्यंत गंभीर परिस्थितीत अडकलेल्या आपल्या परिवाराचे खूप समजदारीने संरक्षण करतात. ही भूमिका आपल्या अनुभव कौशल्याने ऋषी  कपूर एवढ्या उत्कृष्ट पद्धतीने साकारु शकले तर यंगस्टार त्यांच्या पुढे टीकाव धरु शकले नाहीत. 

* सौरभ शुक्ला
अजय देवगनच्या ‘रेड’ चित्रपटात व्हिलन बनलेले अ‍ॅक्टर सौरभ शुक्ला यांची जेवढी प्रशंसा केली तेवढी कमी आहे. इन्कम टॅक्सशी संबंधीत सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात सौरभ एक दिग्गज राजकारणी नेता होता, जो त्याच्या परिवाराचेही ऐकून न घेता स्वत:चेच खरे मानतो. या चित्रपटात अजय देवगनच्या उत्कृष्ट परफॉर्मन्सलाही सौरभ यांनी टक्कर दिली होती.  

* रजत कपूर
रजत कपूर हे दीर्घ काळापासून बॉलिवूडमध्ये काम करत आहेत. मात्र ‘राजी’ मध्ये त्यांच्या लहानशा परफॉर्मन्सने आपणास जाणिव करुन दिली की, त्यांच्यासारख्या दिग्गज कलाकाराचा उपयोग किती कमी होत आहे. त्यांनी ‘राजी’ मध्ये भारताच्या माजी गुप्तचराची भूमिका साकारली आहे, जे कॅन्सर पीडित आहेत. ते आपल्या मुलीला देशाची सेवा करण्यास तिची मदत करतात आणि गुप्तचर बनण्यासाठीही सांगतात. यात रजत यांची भूमिका एक दृढ, सहानुभूतिपूर्ण आणि देशाभिमान बाळगणाऱ्या  एका व्यक्तिची आहे.    

 * नीना गुप्ता आणि गजराज राव
नीना गुप्ता यांनी काही वर्ष अगोदर एक पोस्ट टाकली होती की, त्यांना कामाची गरज आहे आणि ‘बधाई हो’ सोबतच त्यांनी सिद्ध करुन दिले की त्या राष्ट्रीय  पुरस्कार विजेत्या का आहेत. या चित्रपटात त्यांनी एका वृद्ध महिलेची भूमिका साकारली आहे, जी प्रेग्नंट होते. यात त्यांना सामाजिक कलंकापासूनच नव्हे तर आपल्या दोन तरुण मुलांचाही सामना करावा लागतो. ही भूमिका त्यांनी अतिशय दमदार निभवली आहे. त्यातच अभिनेता गजराज राव यांनीही त्यांना टक्कर देऊन एक उत्कृष्ट परफॉर्मन्स सादर केले आहे. यात त्यांनी एका वृद्ध व्यक्तिची भूमिका साकारली असून जे आपली पत्नी प्रेग्नंट झाल्याने तिच्यासोबत उभा राहतो आणि घरात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांच्या भूमिकेने सर्वांनाच खूश केले.  

* अनिल कपूर
‘रेस 3’ ने जरी प्रेक्षकांना नाराज केले मात्र अनिल कपूर यांनी आपणास त्यांच्या दमदार परफॉर्मन्सने चकितच केले. त्यांनी आपल्या भूमिकेला योग्य प्रकारे न्याय देत आपल्या अभिनयाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. जर अनिल कपूर ‘रेस 3’ सारख्या चित्रपटातही एवढे उत्कृष्ट काम करु शकतो तर खरच ते जबरदस्त टॅलेंटेड अ‍ॅक्टर आहेत.  

Web Title: Young actors forced to act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.