2020 वर्ष सेलेब्रिटी कपलसाठी राहिले UNLUCKY, कोरोनामुळे लव्हबर्ड्सचे लांबले लग्न !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 02:27 PM2020-12-15T14:27:53+5:302020-12-15T14:29:47+5:30

2020 हे बॉलिवूडसाठीही लग्नाचे वर्ष ठरणार होते. पण तसे होऊ शकले नाही. अनेक सेलिब्रेटी कपल 2020 मध्ये लग्न करण्याच्या तयारीत होते मात्र अचानक कोरोना संकट आले आणि आनंदावर पाणी फिरले.

Year Ender bollywood marriages cancel in 2020 due to lockdown corona virus pandamic | 2020 वर्ष सेलेब्रिटी कपलसाठी राहिले UNLUCKY, कोरोनामुळे लव्हबर्ड्सचे लांबले लग्न !

2020 वर्ष सेलेब्रिटी कपलसाठी राहिले UNLUCKY, कोरोनामुळे लव्हबर्ड्सचे लांबले लग्न !

googlenewsNext

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा या दोघांनी तर २०२० मध्येच लग्न करणार असल्याची अप्रत्यक्षरित्या जाहीर केले होते. परंतु कोरोनामुळे लग्न तर दुरच दोघांनाही  लॉकडाऊनमध्ये वेळ घालवावा लागला. दरम्यान दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले.

आता ते पूर्णपणे बरे झाले असून सर्व काही सुरळीत होण्याची जणू वाट पाहात आहेत. तेव्हाच या दोघांचा लग्नाचा बार उडेल असे सध्या तरी दिसतंय.

 

ट्रेंडिंग कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची अफवा होती.  रणबीर आणि आलियाला बर्‍याचदा एकत्र पाहिले गेले. 2020 मध्ये दोघेही लग्न करणार असल्याच्याही चर्चा रंगल्या. पण तसे होऊ शकले नाही.

अली फजल आणि रिचा चड्ढा यांनी जाहीर केले होते की ते 2020 मध्ये लग्न करणार आहेत. लग्नाची तयारीही सुरू झाली होती. पण यानंतर कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन झाला आणि जोडीने त्याचा विचार बदलला आणि लग्न या वर्षी तरी करणार नसल्याचे जाहीर केले.


फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या उत्कृष्ट बॉन्डिंगबद्दल सर्वांना माहिती आहे. 2020 मध्ये या दोघांच्याही लग्नाच्या बातम्या आल्या होत्या.


2020 पूर्वी वरुण धवन आणि नताशा दलालच्या याचीही लग्नाची पूर्ण तयारी झाली होती. मात्र कोरोनामुळे दोघांचाही मुड बदलला, लग्नाची तारिख पुढे ढकलत सध्या त्यांचे संपूर्ण लक्ष त्यांच्या करिअरकडे असल्याचे त्यांनी सांगितले. वरुण धवन 2021 मध्ये लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.

भावाच्या लग्नानंतर अशी चर्चा आहे की आदर जैनसुद्धा  गर्लफ्रेंड तारा सुतारियाशी लग्न करत आपल्या आयुष्याची नवी सुरूवात करणार आहे. आदर आणि तारा नेहमीच त्यांच्या अफेअरमुळे चर्चेत असतात. आयुष्याची नवीन सुरूवात करण्यासाठी 2021 मध्ये त्यांचे लग्न करू शकतात. 

Web Title: Year Ender bollywood marriages cancel in 2020 due to lockdown corona virus pandamic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.