Year Ender 2019 : या वर्षांत पडद्यावरून गायब दिसले ‘हे’ बडे स्टार्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 08:00 AM2019-12-23T08:00:00+5:302019-12-23T09:43:43+5:30

सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे अनेक चेहरे यंदा स्क्रीनवरून गायब दिसले. अशाच काही चेह-यांबद्दल...

year ender 2019 these bollywood stars did not seen in any MOVIE including shahrukh khan and deepika padukone | Year Ender 2019 : या वर्षांत पडद्यावरून गायब दिसले ‘हे’ बडे स्टार्स

Year Ender 2019 : या वर्षांत पडद्यावरून गायब दिसले ‘हे’ बडे स्टार्स

googlenewsNext

या वर्षी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांची बक्कळ कमाई केली. पण सुपरहिट ठरलेल्या या चित्रपटांमध्ये अनेक दिग्गज स्टार्स नव्हते. सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे अनेक चेहरे यंदा स्क्रीनवरून गायब दिसले. अशाच काही चेह-यांबद्दल...

शाहरूख खान

2018 मध्ये शाहरूख खानचा ‘झिरो’ प्रदर्शित झाला. पण हा चित्रपट दणकून आपटला. यानंतर 2019 मध्ये एकाही चित्रपटात शाहरूख झळकला नाही. या वर्षात त्याने कुठल्याही नव्या प्रोजेक्टची घोषणा केली नाही. अर्थात लवकरच तो राज निदिमोरू व कृष्णा डीकेच्या अ‍ॅक्शन थ्रीलर मुव्हीमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे.

दीपिका पादुकोण

2018 मध्ये दीपिका पादुकोणचा ‘पद्मावत’ रिलीज झाला होता. त्यानंतर 2019 मध्ये दीपिकाचा एकही सिनेमा रिलीज झाला नाही. अर्थात या वर्षांत ती दोन प्रोजेक्टमध्ये बिझी होती. एक म्हणजे, ‘छपाक’ आणि दुसरा म्हणजे ‘83’. पण दीपिकाचे हे दोन्ही सिनेमे नव्या वर्षांत म्हणजे 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहेत.

रणबीर कपूर

गतवर्षी आलेला रणबीर कपूरचा ‘संजू’ हा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला होता. यात रणबीरने संजय दत्तची व्यक्तिरेखा साकारली होती. ‘संजू’नंतर या मावळत्या वर्षांत रणबीरचा एकही सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला नाही. त्याचा ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा नव्या वर्षांत पे्रक्षकांच्या भेटीस येणार आहे.

आमिर खान

2018 मध्ये आमिर खानचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ प्रदर्शित झाला आणि दणकून आपटला. यानंतर गत वर्षभरात आमिर रूपेरी पडद्यावरून गायब दिसला. आता त्याच्या नव्या चित्रपटासाठी प्रेक्षकांना 2020 ची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

ऐश्वर्या राय बच्चन

2018 मध्ये रिलीज झालेला ‘फन्ने खां’ हा ऐश्वर्याचा अखेरचा सिनेमा. त्यानंतर एकाही चित्रपटात ती झळकली नाही.

इरफान खान

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता इरफान खानचे 2018 मध्ये ‘कारवां’ व ‘ब्लॅकमेल’ असे दोन सिनेमे रिलीज झाले. यानंतर यावर्षी तो कुठल्याच सिनेमात दिसला नाही. पुढील वर्षांत त्याचा ‘अंग्रेजी मीडियम’ हा सिनेमा रिलीज होत आहे.

अनुष्का शर्मा

अनुष्का शर्माने यावर्षी चित्रपटामधून ब्रेक घेतला. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’मध्ये ती दिसली. यानंतर तिने एकही सिनेमा साईन केलेला नाही.


 

Web Title: year ender 2019 these bollywood stars did not seen in any MOVIE including shahrukh khan and deepika padukone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.