Year Ender: प्रियंका ते मलायका... या वर्षात ‘या’ स्टार्सला करावा लागला Oops मोमेंटचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 08:00 AM2019-12-30T08:00:00+5:302019-12-30T08:00:01+5:30

बॉलिवूडच्या ललना अनेकदा फॅशनच्या नावावर फजिती ओढवून घेतात. 2019 मध्येही असेच काही झाले.

year ender 2019 malaika arora to priyanka chopra bollywood celebrities faced oops moment | Year Ender: प्रियंका ते मलायका... या वर्षात ‘या’ स्टार्सला करावा लागला Oops मोमेंटचा सामना

Year Ender: प्रियंका ते मलायका... या वर्षात ‘या’ स्टार्सला करावा लागला Oops मोमेंटचा सामना

googlenewsNext

बॉलिवूड स्टार्स आणि त्यांची स्टाईल हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. अनेकदा बॉलिवूड स्टार्स काही चित्रविचित्र कपडे घालून स्वत:ची एकप्रकारे शोभा करून घेतात. बॉलिवूडच्या ललना तर अनेकदा  फॅशनच्या नावावर फजिती ओढवून घेतात. 2019 मध्येही असेच काही झाले. त्यावर एक नजर...

मलायका अरोरा

(साभार)

मलायका अरोराला यंदा तिच्या कपड्यांमुळे फजिती सहन करावी लागली. होय, यावर्षी नोव्हेंबरमध्ये मलायका एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती. या इव्हेंटमध्ये तिने निळ्या रंगाची पँट आणि क्रॉप टॉप घातला होता. डीप नेकच्या या टॉपमध्ये मलायकाचे क्लीवेज स्पष्ट दिसत होते. मीडियाला पोज देताना मलायकाचा हा क्रॉप टॉप सरकला आणि मलायकाला सर्वांसमोर लाजीरवाणे होण्याची वेळ आली. तिच्या हे लक्षात येताच तिने काढता पाय घेतला.

नोरा फतेही


नोरा फतेही यावर्षी ऊप्स मोमेंटची शिकार होता होता थोडक्यात बचावली. होय, नोरा व विकी कौशलने ‘पछताओगे’ या गाण्याच्या सक्सेस पार्टीत हजेरी लावली होती. यावेळी नोराने घातलेला डिझायनर ड्रेस नोरासाठी मात्र डोकेदुखी ठरला होता. पूर्ण वेळ ती हा ड्रेस सावरताना दिसली. यामुळे नोरा भलतीच नर्व्हस झाली होती.
  यावेळी विक्की कौशल आणि नोरा फतेहीने  गाण्यावर डान्स केला. या डान्स दरम्यान नोरा उप्स मोमेंटचीही शिकार होता होता थोडक्यात बचावली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

प्रियंका चोप्रा


प्रियंका चोप्रा व तिचा पती निक जोनास यांचा एक व्हिडीओ यावर्षी जुलैमध्ये व्हायरल झाला होता. या प्रियंका जोनास ब्रदर्सचे ‘सकर’ हे गाणे गाताना दिसली होती. गाता गाता प्रियंका उप्स मोमेंटची शिकार झाली आणि तिला पत्ताही लागला नाही.

शिल्पा शेट्टी


शिल्पाने युरोप ट्रिपमधील एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत ती क्रुझवर   पोझ देताना दिसली होती. याचदरम्यान अचानक शिल्पाचा ड्रेस हवेमुळे उडू लागला. तिने ऐनकेन प्रकारे तो सांभाळला होता.  

नेहा कक्कर


नेहा कक्कर ‘इंडियन आयडल’च्या सेटवर उप्स मोमेंटची शिकार ठरली होती. तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात ती आदित्यसोबत दिलबर गाण्यावर डान्स करताना दिसली होती. पण आदित्य तिला सांभाळू शकला नाही आणि नेहा धाडकन खालीपडली होती. अशाप्रकरे ती उप्स मोमेंटची शिकार ठरली होती.

Web Title: year ender 2019 malaika arora to priyanka chopra bollywood celebrities faced oops moment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.