-रवींद्र मोरे
जगभरात सर्वाधिक प्रशंसा मिळविणाऱ्यांची यादी जाहिर करणाºया एका संस्थेने या वर्षाची सर्वात प्रशंसित व्यक्तिंची यादी नुकतिच जाहिर केली आहे. या यादीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहित बॉलिवूडच्या काही स्टार्सचा समावेश आहे. या यादीत महानायक अमिताभ बच्चन सहित शाहरुख खान आणि सलमान खानचेही नाव समावेश आहे.

* अमिताभ बच्चन


इंटरनेट आणि डाटा मार्केटिंग फर्मच्या या संस्थेने ही यादी आॅनलाइन वोटिंगच्या आधारे जाहिर केली आहे. बॉलिवूडच्या पुरुष कलाकारांच्या यादीत सर्वांपेक्षा टॉप वर अमिताभ बच्चन यांचे नाव आहे. या संस्थेने त्यांना आपल्या यादीत १२ वे स्थान दिले आहे. तर किंग खान अर्थात शाहरुख खान या यादीत १६ व्या स्थानी आहे.

* सलमान खान


शाहरुख आणि अमिताभ बच्चन यांच्यानंतर सलमान खानदेखील या यादीत आपले स्थान बनविण्यात यशस्वी झाला आहे. या यादीत सलमान १८ व्या स्थानी आहे. तर अभिनेत्रींचा विचार केला तर या यादीत बच्चन परिवाराची सून ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रासह दीपिका पादुकोण आणि सुष्मिता सेन यांचाही समावेश आहे.

* दीपिका पादुकोण


महिलांच्या यादीत दीपिका पादुकोण १३ व्या स्थानावर आहे. अर्थात बॉलिवूड अभिनेंत्रींमध्ये दीपिका टॉपवर आहे. दीपिकानंतर नेहमी चर्चेत राहणारी प्रियांका चोप्राचेही नाव येते. तिने या यादीत १४ वे स्थान मिळविले आहे. ऐश्वर्या राय बच्चन १६ व्या स्थानी तर सुष्मिता सेन १७ व्या स्थानी आहे.

* सुष्मिता सेन


यादीत नाव जाहिर झाल्यानंतर सुष्मिता सेनने फॅन्सकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल सोशल मीडियाद्वारा आभार मानले आहेत. तिने ट्विटर आणि इस्टाग्रामवर ही संपूर्ण यादी जाहिर करुन फॅन्सना धन्यवाद म्हटली आहे. तिचे फॅन्सदेखील कमेंट्स करुन आपली प्रतिक्रिया देत आहेत.


Web Title: world most admired bollywood stars
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.