बॉलिवूडच्या सौंदर्यवती अभिनेत्री रेखा या कित्येक दशकांपासून सिनेइंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवत आहेत. त्या त्यांच्या सौंदर्य व अदाकारीसाठी ओळखल्या जातात. पन्नास वर्षांच्या करियरमध्ये त्यांनी जवळपास १८० चित्रपटात काम केले आहे. रेखा यांनी ६०च्या दशकात आपल्या सिनेकरियरला सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. रेखा कोणाच्या नावाने सिंदूर लावते हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असतात. रेखाची सेक्रेटरी फरजानामुळे सुद्धा लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित राहिले होते.  

रेखा आणि फरजाना यांच्यामध्ये कोणते नाते आहे हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक होते. फरजाना गेल्या ३२ वर्षांपासून रेखा यांच्यासोबत आहे.


मोहनदीप नावाच्या पत्रकाराने त्यांच्या पुस्तकामध्ये रेखा यांची सेक्रेटरी फरजानाबद्दल बरेच काही लिहिले आहे. या पुस्तकानुसार रेखाचे तिची सेक्रेटरी फरजानासोबत खूप जवळचे नाते आहे.


फरजाना नेहमी पुरुषांसारखे कपडे परिधान करत असते. मोहनदीपने त्यांच्या पुस्तकामध्ये रेखा यांच्या बेडरू़मबद्दल अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. त्यांनी लिहिले आहे की रेखा यांच्या बेडरूममध्ये कोणालाही जाण्याची परवानगी नाही. परंतु फरजानाला त्यांच्या रूममध्ये येण्या-जाण्याची पूर्ण मुभा आहे.याशिवाय पत्रकार मालविका संघवी यांनी म्हटले की, रेखा फरजानाशिवाय नाही राहू शकत. फरजानाला माहित आहे की रेखाला कोणत्या गोष्टींपासून त्रास आहे. या गोष्टींमध्ये किती सत्यता आहे हे आम्हाला ठाऊक नाही. पण रेखा तिच्या सेक्रेटरी फरजानाला आपली बहिण मानते.


दक्षिण भारतीय अभिनेते जेमिनी गणेशन आणि पुष्पवल्ली यांची मुलगी असलेल्या रेखा यांनी बॉलिवूड मध्ये त्यांचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. रेखा यांचे मूळ नाव भानुरेखा असले तरी सिनेसृष्टी मध्ये येण्यासाठी त्यांनी रेखा हे नाव धारण केले. १९७० मध्ये आलेला सावन भादो हा त्यांचा पहिला चित्रपट होता. खुबसूरत, खून भरी मांग, उमराव जान, घर, सिलसिला, मुक्कदर का सिकंदर अशा एकाहून एक सरस चित्रपटांत त्यांनी उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The woman, who has been with Rekha for the last 32 years, will be shocked to hear the allegations against her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.