Into the Wild Trailer: "हा काही खेळ नाही ब्रो"; Bear Grylls सोबत Into the Wild मध्ये दिसणार Ajay Devgan

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 08:56 AM2021-10-13T08:56:20+5:302021-10-13T08:56:48+5:30

Into The Wild with Bear Grylls : बॉलिवूडचा अॅक्शन हिरो दिसणार या लोकप्रिय शोमध्ये. नुकताच या एक ट्रेलर प्रसिद्ध करण्यात आला.

Into the Wild Trailer: "It's not a game bro"; Ajay Devgan will be seen with Bear Grylls | Into the Wild Trailer: "हा काही खेळ नाही ब्रो"; Bear Grylls सोबत Into the Wild मध्ये दिसणार Ajay Devgan

Into the Wild Trailer: "हा काही खेळ नाही ब्रो"; Bear Grylls सोबत Into the Wild मध्ये दिसणार Ajay Devgan

Next
ठळक मुद्देबॉलिवूडचा अॅक्शन हिरो दिसणार या लोकप्रिय शोमध्ये. नुकताच या एक ट्रेलर प्रसिद्ध करण्यात आला.

बॉलिवूडचा अॅक्शन हिरो (Bollywood Action Hero) अजय देवगण (Ajay Devgan) लवकरच लोकप्रिय शो Into The Wild with Bear Grylls मध्ये दिसणार आहे. शोच्या नवीन भागाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये अजय देवगण आणि बेअर ग्रिल्स धोक्यांशी लढताना साहस आणि साहसाने भरलेल्या प्रवास पूर्ण करतील. हा भाग २२ ऑक्टोबर रोजी डिस्कव्हरी प्लसवर (Discovery +) प्रसारित केला जाईल.

"Bear Grylls सोबत मी हिंद महासागरातील निर्जन बेटे एक्सप्लोअर केली. हा कोणताही खेळ नाही ब्रो. आमच्या Into The Wild मधील अविस्मरणीय प्रवासाची झलक. २२ ऑक्टोबर रोजी डिस्कवरी प्लसवर आणि २५ ऑक्टोबर रोजी डिस्कवरी चॅनेलवर प्रसारण होईल," असं अजय देवगणनं ट्रेलर शेअर करत लिहिलं आहे.

 
ट्रेलर समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये या भागाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. ट्रेलरमध्ये अजय, बेअर ग्रिल्ससह हिंद महासागराच्या जंगलांमध्ये आणि समुद्राच्या मोठ्या लाटांमध्ये धोक्यांचा सामना करताना दिसत आहे. दोघेही समुद्रात शार्क माशांच्या मध्येही पोहताना दिसत आहेत. अजय देवगण मालदीवच्या जंगलात बेअर ग्रिल्सशी लढताना दिसला. हा भाग पाहून प्रेक्षकांना अधिक आनंद मिळेल असंही त्यानं म्हटलं आहे.

हा एपिसोड सप्टेंबर महिन्यात मालदीव मध्ये शूट करण्यात आला होता. मालदीवमध्ये अजय देवगण सोबत त्याचा मुलगा युग आणि टीम उपस्थित होती. ट्रेलरमध्ये अजय देवगण हा काही खेळ नाही असं म्हणताना दिसतोय, तर बेअर ग्रिल्स हा आपला परिसर आहे असं सांगताना दिसत आहे.

Web Title: Into the Wild Trailer: "It's not a game bro"; Ajay Devgan will be seen with Bear Grylls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app