ठळक मुद्देबॉलिवूडटची बेबी डॉल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सनी लिओनीने तिच्या करिअरच्या काळात बरेच चढ-उतार पाहिले आहेत.

पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री हा प्रवास सनी लिओनीसाठी सोपा नव्हता. या काळात तिला अनेक टीका सहन करावी लागली. पण सनी या काळात खंबीरपणे उभी राहिली आणि पॉर्न स्टार ही ओळख मिटवून बॉलिवूड अभिनेत्री ही नवी ओळख तिने निर्माण केली. सनीने तिचे खासगी आयुष्य कधीच लपवले नाही. उलट जे आहे ते तिने उघडपणे जगासमोर मांडले. एका ताज्या मुलाखतीतही तिने असाच एक मोठा खुलासा केला. होय, मी कधीच माझ्या आई-वडिलांचे फोटो पाहत नाही, असे तिने या मुलाखतीत सांगितले. आता असे का तर, सनीने त्याचेही उत्तर दिले. शिवाय सनीच्या आयुष्यावर आधारित ‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ या वेब सीरिजवरही ती बोलली.  


माझ्या आयुष्यावर वेबसीरिज बनवण्याचा निर्णय सोपा नव्हता. पण मी ही वेबसीरिज बनवण्याचा निर्णय घेतला. कारण यात केवळ माझा पॉर्न स्टार बनण्यापर्यंतचा प्रवास नव्हता तर माझा अख्खा जीवनप्रवास होता. लोकांची मतं बदलणे शक्य नाही. पण या वेब सीरिजमुळे लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, असे मला वाटले.

माझे बालपण, माझा संघर्ष, अ‍ॅडल्ट स्टार बनण्याचा मी घेतलेला निर्णय, यानंतरचा संघर्ष हे सगळे काही या वेबसीरिजमध्ये होते. या वेबसीरिजमध्ये मी स्वत:च काम केले. त्यामुळे याचे शूटींग करताना मला पुन्हा भूतकाळात जावे लागले. पुन्हा त्या कटू आठवणी जगाव्या लागल्या, असे ती म्हणाली.

मी कधीच माझ्या आईवडिलांचे फोटो पाहत नाही. कारण त्यांचे फोटो पाहिल्यावर मला त्यांची आठवण येते. पण वेबसीरिज शूट करताना सेटवर त्यांचे फोटो होते. त्यामुळे हे शूट माझ्यासाठी अतिशय कठीण होते, असेही तिने सांगितले.

 


Web Title: why sunny leone revealed usually never see her parents photographs
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.