BlacksLivesMatter नाही, सारा अली खान म्हणाली ALLLivesMatter, झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 12:43 PM2020-06-05T12:43:20+5:302020-06-05T12:43:20+5:30

वाईट पद्धतीने ट्रोल होत आहे म्हटल्यावर साराने ती पोस्ट डिलीट केली. पण तोपर्यंत कमाल राशिद खान अर्थात केआरके हा सुद्धा मैदानात उतरला होता. त्यानेही साराला लक्ष्य केले़.

why sara ali khan deleted post of all lives matter and connection with george floyd case | BlacksLivesMatter नाही, सारा अली खान म्हणाली ALLLivesMatter, झाली ट्रोल

BlacksLivesMatter नाही, सारा अली खान म्हणाली ALLLivesMatter, झाली ट्रोल

googlenewsNext

जॉर्ज फ्लॉयड या अमेरिकन कृष्णवर्णीयाच्या मृत्यूनंतर जगभरात संतापाचे वातावरण आहे. जगभर या घटनेचा निषेध केला जात आहे. हॉलिवूडसोबत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. यातच अभिनेत्री सारा अली खान हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आणि या पोस्टने सारावर ट्रोल होण्याची वेळ आणली. वाईट पद्धतीने ट्रोल होत आहे म्हटल्यावर साराने ती पोस्ट डिलीट केली. पण तोपर्यंत
कमाल राशिद खान अर्थात केआरके हा सुद्धा मैदानात उतरला होता. त्यानेही साराला लक्ष्य केले़.

काय होती साराची पोस्ट
जॉर्ज फ्लॉयडचा मृत्यूनंतर सोशल मीडिया #BlacksLivesMatter ही मोहिम सुरु आहे. अनेक लोकांनी या मोहिमेला पाठींबा दिला आहे. याचदरम्यान सारा अली खानने AllLivesMatterचा मॅसेज देत एक पोस्ट शेअर केली, यात तिने ‘ब्लॅक’ शब्द खोडून त्यावर ‘ऑल लाइव्स’ असे लिहिले. तिच्या या पोस्टमध्ये एक फोटोही होत. यात वेगवेगळया रंगांचे हात होते आणि यातच शेवटी हत्तीची सोंडही होती. मग काय तिची ही पोस्ट पाहून नेटकरी अक्षरश: तिच्यावर तुटून पडले.

केआरकेने तर साराचा क्लासच घेतला. त्याने साराची खिल्ली उडवली. एक व्हिडीओ त्याने शेअर केला. यात तो म्हणतो, ‘मित्रांनो, सारा अली खान खूप दु:खी आहे. अमेरिकेत  कृष्णवर्णीय मारला गेला आणि भारतात एक हत्तीण मारली गेली. या दोन्हींमुळे सारा दु:खात आहे. ती बिचारी खूप रडतेय. सुमारे 2 हजार बायका, मुल, वृद्ध, तरूण रस्त्यांवर चालतांना मेलेत. रेल्वेगाड्यांमध्ये अन्नपाण्याविना त्यांनी जीव सोडला, तेव्हा या बिचारीला काहीही दु:ख झाले नाही. तिला माहित असते तर ती रडलीही असती...’

अर्थात केआरकेची ही खिल्ली लोकांनी फार सीरिअसली घेतली नाही. पण नेटक-यांनीही साराला फैलावर घेतले. ‘प्रत्येक गोष्टीत मस्करी करणं योग्य नाही’, असे एका युजरने तिला सुनावले.  तर अन्य एकाने नीट माहिती नसेल तर बोलू नये, असा सल्ला तिला दिला.


 

Web Title: why sara ali khan deleted post of all lives matter and connection with george floyd case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.