आजच्या तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणारी अभिनेत्री म्हणजे मिथीला पालकर. एक उत्स्फूर्त आणि कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. इतकेच नाही तर आपल्या अभिनयाची जादूही मिथीलाने दाखवून दिली आहे. मिथीला आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग आहे. कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते.

विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते. मिथिलाने नुकतेच इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे.नेहमीप्रमाणे यावेळीही तिचे फोटो सा-यांचे आकर्षण ठरत आहे. तिचं सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचे दिसून येत आहे. तिच्या या फोटोला फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. 

अभिनेता आलोक राजवाडे आणि निपुण धर्माधिकारी यांच्यानंतर आता ‘गर्ल इन द सिटी’ आणि ‘लिटील थिंग्स’ या वेबसिरीजमधील भूमिकांमुळे ‘वेब क्वीन’ म्हणून ओळखली जाते. कपच्या तालावरील तिचे ‘हिची चाल तुरु तुरु...’ नेटिझन्ससह रसिकांनाही भावले होते. मात्र तेव्हापासून एक अभिनेत्री म्हणून तिने मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागेल.

इतकेच नव्हे तर तिचे प्रतिष्ठेच्या ‘फोर्ब्स इंडिया’ मासिकाने प्रसिद्ध केलेल्या आशिया खंडाच्या यादीत झळकले आहे. इरफान खानसोबत 'कारवां' सिनेमातही ती झळकली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते.

Web Title: Why Mithila Palkar's Photos Are Being Viral On Social Media?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.