Why does Suhana Khan's dance video become viral, is that the reason? | सुहाना खानचा हा डान्स व्हिडीओ का होतोय व्हायरल, तर हे आहे त्याचे कारण?
सुहाना खानचा हा डान्स व्हिडीओ का होतोय व्हायरल, तर हे आहे त्याचे कारण?

शाहरूख खानची मुलगी सुहाना खान हे आता सा-यांनाच माहिती पडले आहे. आपल्या अॅक्टींग डेब्यूपासून सुहाना अजुन लांब असली तर त्यापूर्वीच ती चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. सोशल मीडियावर खूप चांगले फॉलोव्हर्स सुहाना खानला मिळाले आहेत. लाईमलाईट मध्ये येण्यासाठी काय करावे हे सुहानाला खूप कमी वेळात चांगलेच समजल्याचे जाणवते. कधी ग्लॅमरस फोटोशूट करत सा-यांचे लक्ष वेधून घेते तर कधी आपले डान्स व्हिडीओ अपलोड करत सा-यांची वाहवा मिळवत असते. नुकतेच सुहानाने एका पबमधला डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओतील ग्लॅमरस अदा तुम्हालाही वारंवार हा व्हिडीओ पाहण्यास भाग पाडतील.


सुहानाचा ग्लॅमरस लूक सा-यांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. एकवेळ अशी होती की, सुहानाच्या फोटोला खूप ट्रोल केले जायचे. तिच्या फोटोला संमिश्र प्रतिक्रीया मिळायच्या. मात्र आपल्या स्टाइल आणि लूक्सला घेवून सुहाना अधिक सजग झाली आहे. इंडस्ट्रीत एंट्री करण्यापूर्वीच तिने आपला  मेकओव्हर केला आहे. आज सुहाना तिच्या स्टायलिश लूकमुळेच सा-यांचे लक्ष वेधून घेत असते. 

मुळात शाहरूखही सुहाना जे काही करेल त्या गोष्टीला खूप सपोर्ट करतो. लंडनमधल्या एका कॉलेजमध्ये सुहाना आपलं शिक्षण पूर्ण केले आहे. कॉलेजमध्ये असताना तिने एका नाटकात भाग घेतला होता. त्यात ज्युलिएटची महत्त्वपूर्ण भूमिका तिने साकारली होती. शाहरुख लेकीच नाटक पाहण्यासाठी लंडनला गेला होता. तिचे काम पाहून तो खूप भारावला. नाटक पाहिल्यानंतर शाहरुखने सुहाना आणि तिच्या टीमचे कौतूक केले होते. 


Web Title: Why does Suhana Khan's dance video become viral, is that the reason?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.