'ये तो कुदरत का करिश्मा' हुबेहुब करिश्मा कपूरची आहे कॉपी, पाहून तुम्हीही चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 05:19 PM2021-04-13T17:19:57+5:302021-04-13T17:24:16+5:30

Heena Khan look a like of karishma kapoor trending on social media: आतापर्यंत अनुष्का शर्मा, अजय देवगन, शाहरुख खान, सलमान खान, सुनील शेट्टी, श्रीदेवी आणि ऐश्वर्या राय बच्च यांच्यासारखे हुबेहूब दिसणारे अनेक लूक अ लाईक समोर आले होते. यात आता करिश्मा कपूरचीह एंट्री झाली आहे.

WHOA! karishma kapoor Carbon Copy Heena Khan Trending On Social Media | 'ये तो कुदरत का करिश्मा' हुबेहुब करिश्मा कपूरची आहे कॉपी, पाहून तुम्हीही चक्रावून जाल

'ये तो कुदरत का करिश्मा' हुबेहुब करिश्मा कपूरची आहे कॉपी, पाहून तुम्हीही चक्रावून जाल

googlenewsNext

राम और श्याम, सीता-गीता, किशन-कन्हैय्या अशा बॉलीवुडच्या विविध सिनेमात आपण डबल रोल पाहिले आहेत. रिअल लाइफमध्ये जुळे बहिण भाऊ असतात हेसुद्धा आपल्याला माहिती आहे. इतकेच नाही तर एकाच चेह-याच्या आणि सेम टू सेम दिसणा-या सात व्यक्ती असतात जगात असतात असं म्हटलं जातं. अशाच सेम टू सेम दिसणा-या व्यक्तींमध्ये  करिश्मा कपूरची डुब्लिकेट हिना खानचाही उल्लेख करावा लागेल. टीकटॉक बंद झाल्यामुळे हिना खान गायब झाली होती. मात्र आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. टीकटॉक बंद झाले म्हणून काय झाले, आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर खूप अ‍ॅक्टिव झाली आहे. हिना आता इन्स्टाग्रामवर आपले व्हिडीओ पोस्ट करत वाहवा मिळत असते.

 हुबेहूब करिश्मा सारखीच हिना दिसते. सध्या करिश्मा बनत हिना तिच्या व्हिडीओंच्या माध्यमातून सध्या इंटरनेट धुमाकूळ घालत आहेत.करिश्माच्याच सिनेमाच्या डायलॉगचे व्हिडीओ शेअर करताना दिसते.हिनाचे व्हिडीओ पाहून सर्वच हैराण झाले आहेत. कारण हिना आणि करिश्माच्या चेहऱ्यात खूपच साम्य आहे. जेव्हा तुम्ही लक्षपूर्वक पाहता तेव्हा तुमच्या लक्षात येत की, ती करिश्मा नाही तर तिच्यासारखी दिसणारी कोणीतरी मुलगी आहे. हिनाचे हे व्हिडीओ पाहिल्यावर सर्वजण तिला 'कुदरत का करिश्मा' असं म्हणताना दिसत आहेत.

आतापर्यंत अनुष्का शर्मा, अजय देवगन, शाहरुख खान, सलमान खान, सुनील शेट्टी, श्रीदेवी आणि ऐश्वर्या राय बच्च यांच्यासारखे हुबेहूब दिसणारे अनेक लूक अ लाईक समोर आले होते. यात आता करिश्मा कपूरचीह एंट्री झाली आहे.

Web Title: WHOA! karishma kapoor Carbon Copy Heena Khan Trending On Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.