अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची मुलगी सारा अली खानने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये तिचे स्थान निर्माण केलं आहे. आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्याने मन जिंकणारी सारा कमालीची नम्र आहे. तिच्या या नम्र स्वभावामुळे सगळीकडून तिचे कौतुक होत असते.  

साराने रक्षाबंधनच्या दिवशी तिच्या बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती खूप क्युट दिसते आहे. तिने हा फोटो शेअर करत लिहिलं की,  माझ्या बेबी ब्रदरला हॅप्पी राखी. आजच्या दिवशी माझ्या पाया पडणं, मला पैसे देणं, मला मिठाई खाऊ घालणे आणि मला मिठी मारणे या सगळ्या गोष्टी मिस करतं आहे.

साराने केदारनाथ या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. तिच्या पहिल्याच चित्रपटातील भूमिकेचे कौतुक झाले होते. त्यानंतर ती सिम्बा या चित्रपटात झळकली. या चित्रपटातील तिचा अभिनय देखील प्रेक्षकांना भावला. ती आता लवकरच कार्तिक आर्यन सोबत लव्ह आज कल २ मध्ये झळकणार आहे.

सध्या तिच्या व्यावसायिक आयुष्याइतके तिचे खाजगी जीवन देखील चर्चेत आहे. कार्तिक आर्यनसोबत तिचे अफेअर सुरू असल्याच्या चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियात रंगल्या आहेत. पण तिने यावर मौन राखणेच पसंत केले आहे. 


 ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये साराने कार्तिकसोबत कॉफी डेटला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून या दोघांची चर्चा सुरू झाली. त्यानंतर लोकमत स्टाईल अवार्ड सोहळ्यात रणवीर सिंगने सारा व कार्तिकची भेट घालून दिली होती.

Web Title: Who is she in photo?, she is currently in the news because of her affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.