While at school, the boyfriend of Tapasya Pannu | शाळेत असताना होता तापसी पन्नूचा बॉयफ्रेंड
शाळेत असताना होता तापसी पन्नूचा बॉयफ्रेंड

ठळक मुद्देनववी इयत्तेत असताना तापसी पडली होती प्रेमातबोर्डाच्या परिक्षेमुळे तापसीच्या बॉयफ्रेंडने केले होते ब्रेकअप

अभिनेत्री तापसी पन्नूने कमी कालावधीत विविध भूमिका सक्षमपणे साकारून प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.  पिंक, मनमर्जियॉं, मुल्क यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका तापसीने केल्या आहेत. नुकतेच एका कार्यक्रमात तिने तिच्या पहिल्या प्रेमाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. नववीत असताना पहिल्यांदा प्रेमात पडल्याचे तापसीने यावेळी सांगितले.

तापसी पन्नू म्हणाली की, मी नववीमध्ये असताना पहिल्यांदा रिलेशनशीपमध्ये अडकले. माझ्या मित्र-मैत्रिणींच्या तुलनेत मला काहीसा उशीरच झाला होता. माझे अफेअर खरेच मजेशीर होते. दहावीच्या बोर्ड परीक्षा येत आहेत, मला अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे आहे, असे सांगून त्याने ब्रेकअप केले होते. मला अजूनही आठवते. त्या काळी आमच्याकडे मोबाईल फोन नव्हते. मी माझ्या घरामागे असलेल्या पीसीओवरून त्याला फोन करायचे.


माझी सूर्यरास सिंह असून जन्म एक ऑगस्टचा. एक आणि सिंह (लिओ) हे भयंकर कॉम्बिनेशन आहे. कामात आणि वैयक्तिक आयुष्यात मला सेंटर ऑफ अटेंशन व्हायला आवडते. जर माझा पार्टनर सहज नियंत्रणात येत असेल, तर मला मजा येत नाही. त्यात काय एक्‍साईटमेंट! मला जोडीदार असा हवा, ज्याच्याकडे मी आदराने पाहावे, असे तापसी सांगते.


दिग्दर्शक अनुराग बासूच्या 'लाइफ इन मेट्रो' चित्रपटाच्या सीक्वलमध्ये तापसीची निवड केली असल्याची चर्चा होती. मात्र आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तापसीने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. मेट्रो चित्रपटाच्या सीक्वलमध्ये आदित्य रॉय कपूरच्या अपोझिट तापसी पन्नूला कास्ट करण्यात आले होते. मात्र आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तापसी या चित्रपटाचा भाग नसणार आहे. तापसीने या चित्रपटाच्या शूटिंगकरिता अनुराग यांच्याकडे तारखांचा तपशील मागितला होता, परंतु अनुराग बासू याविषयी निश्‍चित काही सांगू शकले नाहीत. त्यामुळे त्यानंतर तापसीने या चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला. तापसीने यापूर्वीच आपला आगामी चित्रपट वूमनियाच्या चित्रीकरणाला सुरू केले आहे.


Web Title: While at school, the boyfriend of Tapasya Pannu
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.