ठळक मुद्दे  विद्याच्या हातात तेव्हा सुमारे 10 सिनेमे होते. मात्र अध्यार्हून जास्त सिनेमांतून तिला काढण्यात आले.

2005 मध्ये ‘परिणीता’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री विद्या बालन हिची आज एक वेगळी ओळख आहे. अर्थात इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीच्या काळात विद्याला कधी हेल्दी बॉडीमुळे तिला हिणवले गेले तर कधी तिला अपशकुनी ठरवून नाकारले गेले. पण याऊपर विद्या कधीच खचली नाही. तिने अनेक नकार पचवले, अनेक अपमान गिळले आणि प्रयत्न सुरू ठेवले. अखेर या कष्टाचे फळ तिला मिळालेच.


स्ट्रगल काळात विद्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. हाताशी सिनेमा नसल्यामुळे अनेकदा तिला पैशांची चणचण भासत असे. बरेचदा हॉटेलचे बिल भरण्यासाठीही पैसे नसत. एकदा तर अशी वेळ आली की, हातातल्या सोनाच्या बांगड्या विकून विद्याने हॉटेलचे बिल भरले होते.
काही दिवसांपूर्वी विद्याने स्ट्रगल काळातील एक वाईट अनुभव सांगितना होता.

 चेन्नईत एका दिग्दर्शकाला भेटायला गेली असताना त्या दिग्दर्शकाने असे काही केले की, विद्या आजही तो प्रसंग विसरू शकलेली नाही. एक दिवस विद्या चेन्नईत एका दिग्दर्शकाला भेटायला गेली होती. विद्याने त्याला कॉफी शॉपमध्ये बसून बोलू असे म्हणले. पण तो मात्र तिला रूमवर येण्याचा आग्रह करत होता. अखेर ती त्याच्यासोबत त्याच्या रूममध्ये गेली. मात्र तिने रूमचा दरवाजा उघडा ठेवला. यानंतर त्या दिग्दर्शकाने या-त्या गोष्टींवर चर्चा केली. पण अखेर विद्याच्या चेह-यावरचे हावभाव आणि रूमचा उघडा दरवाजा यावरून तो समजायचे ते समजला आणि 5 मिनटांत त्याने रूममधून पळ काढला होता.

 स्ट्रगल काळात विद्यासोबत अशा अनेक घटना घडल्या.  विद्याच्या हातात तेव्हा सुमारे 10 सिनेमे होते. मात्र अध्यार्हून जास्त सिनेमांतून तिला काढण्यात आले. चेन्नईमध्ये जेव्हा विद्याचे आई- बाबा निर्मात्यांकडे तिला सिनेमांतून काढून टाकण्याचे कारण विचारायचे तेव्हा निर्माते तिचा फोटो दाखवून, ‘ती कोणत्या अंगाने अभिनेत्री दिसते’ असा उलट प्रश्न विचारायचे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: When Vidya Balan Mortgaged Her Bangles to Pay Hotel Bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.