- रवींद्र मोरे
प्रत्येकाला तारुण्य मनापासून आवडत असते. असा कोणताही व्यक्ती नाही ज्याला वृद्ध होणे आवडत असेल. मात्र जीवनाचे एक सत्य आहे की, मनुष्याचे जसजसे वय वाढते तसतसा तो वृद्ध होत जातो. वय वाढल्यानंतर आपल्या स्वभावातही तेवढाच बदल होत असतो हे तेवढेच खरे आहे. या स्वभावाचे उग्र रुप तेव्हा दिसते जेव्हा आपल्याला कोणी या वयात काका किंवा काकू म्हणून संबोधतो. विशेषत: एखाद्या सेलेब्रिटीला हे शब्द वापरले तर ते आणखीच जास्त चिडतात. आज आपण अशाच काही स्टार्सविषयी जाणून घेऊया...

* करिना कपूर


अरबाज खानच्या नव्या चॅट शोमध्ये एकदा करिना कपूूर आली होती आणि त्याने करिनाला तिच्या ट्विटरवर तिच्याबाबतीत लिहिलेल्या गोष्टी वाचून दाखविल्या होत्या. त्यात एका यूजरने लिहिले होते की, ‘आंटीं तूम्ही टीनएज मुलींसारखे व्यवहार करायला नको...’ यावरुन ती खूपच चिडली होती. शिवाय शोच्या टीजरमध्ये करिना या गोष्टीने नाराजही झाली होती आणि तिने म्हटले होते की, लोकांना वाटते की, स्टार्सना कोणत्याच भावनाच नसतात.

* सलमान खान
जुडवा चित्रपटाच्या ट्रायल वेळी जेव्हा सात वर्ष लहान वरुण धवन, सलमान खानला भेटायला पोहचला होता, तेव्हा त्याने सलमानला ‘अंकल’ म्हणून हाक मारली होती. वरुण याबाबतीत म्हटला होता की, जेव्हा तो जुडवाच्या ट्रायलसाठी गेला होता तेव्हा सलमानला ‘सलमान अंकल’ बोलला, यावरुन तो खूपच संतप्त झाला होता. सलमान, वरुणला म्हटला होता की, ‘जर मला तू पुन्हा अंकल म्हटला तर मी तुला चापट मारेल, मला सलमान भाई बोल. मला फरक पडत नाही की तू डेविड धवनचा मुलगा आहे, मात्र जर तू मला अंकल म्हटला तर मी तुला थिएटरमध्ये येऊ देणार नाही.’

* ऐश्वर्या राय


२०११ मध्ये सोनम कपूरने ऐश्वर्या रायला एका प्रेस कॉन्फरन्समध्ये आंटी म्हटले होते. खरं तर सोनम आणि ऐश्वर्याला लोरियाल पॅरिसची अ‍ॅम्बेसेडर होण्यासाठी फ्रान्सच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सोबत वॉक करायचे होते, मात्र ऐश्वर्याने सोनमसोबत वॉक करण्यास नकार दिला. त्यानंतर संतापलेल्या सोनमने तिला प्रेस कॉन्फरन्समध्ये आंटी म्हटले होते. जेव्हा सोनमला असे म्हटल्याचे कारण विचारले तेव्हा ती म्हटली की, ऐश्वर्याने माझ्या वडिलांसोबत काम केले आहे आणि सोनमसाठी तिला आंटी म्हणणे नैसर्गिक आहे. ही गोष्ट ऐश्वर्याला आवडली नव्हती आणि ती खूप चिडलीदेखील होती.

* दीपिका पादुकोण


अलिकडे झालेल्या एका सिने अवॉर्ड्समध्ये दीपिका पादुकोण थोडी नाराज झाली होती, जेव्हा तिला अभिनेता विक्की कौशलने ‘वहिणी’ म्हणून हाक मारणे सुरु केले होते. त्यानंतर दीपिकाने विक्कीला असे बोलण्यास मनाई केली. तशी ही गोष्ट मजाकमध्ये झाली होती, मात्र तरही काहीअंशी दीपिकाला वाईट वाटलेच असेल.

* शाहरुख खान


एकदा सैफ अली खानची मुलगी सारा अली खानने फिल्मफेयर अवॉर्ड्सच्या बाबतील तिच्या आठवणी सांगताना शाहरुख खानला ‘अंकल’ बोलून गेली, मात्र त्यानंतर शाहरुखला फारसा फरक नाही पडला, मात्र त्याचे फॅन्स साराच्या मागेच लागून गेले होते. सारा असे म्हटली होती की, माझे वडिल सैफ, शाहरुख अंकलसोबत फिल्मफेयर होस्ट करायचे आणि मला ते खूप आवडायचे.’ यावरुन शाहरुखच्या फॅन्सने साराला खरी-खोटी सुनावली होती. नंतर मात्र साराच्या फॅन्सनेही तिची साथ दिली.


Web Title: When 'Uncle-Aunty' is called 'These' stars are angry!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.