VIDEO : "नको नको... गप्प बस"...जेव्हा सनी लिओनी मराठीत बोलते!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 06:46 PM2021-12-03T18:46:30+5:302021-12-03T19:41:18+5:30

Sunny Leone Talks in Marathi : अक्षय कुमार, अजय देवगन, सलमान खान तर काही अभिनेत्री देखील मराठी फाडफाड बोलतात. यात आता आणखी एका अभिनेत्रीचं नाव सामिल झालं आहे. ते नाव म्हणजे सनी लिओनी.

when Sunny Leone Talk in Marathi watch what she said | VIDEO : "नको नको... गप्प बस"...जेव्हा सनी लिओनी मराठीत बोलते!

VIDEO : "नको नको... गप्प बस"...जेव्हा सनी लिओनी मराठीत बोलते!

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये असे अनेक मोठे स्टार्स आहेत जे मराठी नसूनही चांगलं मराठी बोलतात. अक्षय कुमार, अजय देवगन, सलमान खान तर काही अभिनेत्री देखील मराठी फाडफाड बोलतात. यात आता आणखी एका अभिनेत्रीचं नाव सामिल झालं आहे. ते नाव म्हणजे सनी लिओनी (Sunny Leone). सनीला फाडफाड मराठी बोलता येत नसलं तरी काही शब्द ती स्पष्टपणे बोलते. लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड (Lokmat Most Stylish Award 2021) हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला त्यावेळी सनी लिओनी चक्क मराठीत बोलताना दिसली. 

लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड २०२१ सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. यावेळी सनी लिओनीही उपस्थित होती. यावेळी तिला पुरस्कार देऊन सन्मानितही करण्यात आलं. अशात होस्टने तिला विचारलं की, आपण मुंबईत राहतो. आणि लोकल भाषा मराठी आहे. तर आपण काहीतरी वेगळं करूया. त्यासाठी beyounick ला स्टेजवर बोलवू आणि काहीतरी मराठी ट्राय करू. तर सनी लगेच 'नको नको' म्हणाली. त्यानंतर beyounick स्टेजवर आला. त्यानंतरही सनी लिओनी होस्टला उलट 'गप्प बस्स' असंही म्हणते. आश्चर्याची बाब म्हणजे ते दोन-तीन शब्द ती बोलते ती स्वत:हून बोलली तिला कुणी सांगितलं नाही.

दरम्यान सनी लिओनीला फार चांगलं मराठी बोलता येत नसलं तरी ती दोन मराठी सिनेमात दिसली आहे. 'बॉईज' सिनेमातील 'कुठे कुठे जायाचं हनीमूनला', 'आमदार निवास' सिनेमातील शांताबाई या गाण्यांवर तिने आयटम नंबर केले आहेत. ही गाणी चांगलीच गाजली. त्यामुळे अर्थातच तिच्या कानावर मराठी पडत होतंच. तिला अजिबातच मराठीचा संबंध नाही असं म्हणता येणार नाही.
 

Web Title: when Sunny Leone Talk in Marathi watch what she said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.