ठळक मुद्देशोएबने एका टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये त्याने सांगितले होते की, सोनालीवर माझे प्रचंड क्रश असून तिच्याकडून होकार मिळवण्यासाठी मी काहीही करू शकतो.

सोनाली ब्रेंद्रे आणि गोल्डी बेहल यांच्या लग्नाला आज 17 वर्षं झाले असून त्या दोघांचे कपल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. गेल्या वर्षी सोनालीला कॅन्सर झाल्यानंतर गोल्डीने तिची प्रचंड काळजी घेतली होती. तिच्यासोबत तो सावलीसारखा सगळीकडे आपल्याला दिसत होता. त्याच्यामुळेच मी या आजाराला तोंड देऊ शकले, असे सोनालीने अनेक मुलाखतींमध्येही सांगितले आहे.

सोनालीने तिच्या करियरची सुरुवात आग या चित्रपटापासून केली होती. हा चित्रपट काही बॉक्स ऑफिसवर चालला नाही. पण दिलजले या तिच्या चित्रपटातील भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले. सोनालीच्या अभिनयासोबतच तिच्या सौदर्यावर तिचे चाहते फिदा होते. केवळ सामान्य लोकच नाहीत तर एक क्रिकेटर देखील तिच्या सौंदर्यावर फिदा झाला होता. पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरला सोनाली प्रचंड आवडत असल्याने तो त्याच्या पाकिटात देखील तिचा फोटो घेऊन फिरत असे. त्याला सोनाली आवडते हे त्याच्या टीममधील देखील सगळ्यांना माहीत होते. शोएबला सोनालीवर क्रश असून तिच्यासाठी तो काहीही करू शकतो असे त्याने एका कार्यक्रमात देखील सांगितले होते. शोएबने एका टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये त्याने सांगितले होते की, सोनालीवर माझे प्रचंड क्रश असून तिच्याकडून होकार मिळवण्यासाठी मी काहीही करू शकतो.

शोएबने या मुलाखतीत मजेशीर अंदाजात सांगितले होते की, सोनालीने माझे प्रेम स्वीकारले नाही तर मी तिचे अपहरण करेन. त्याचे हे उत्तर ऐकून सगळ्यांनाच हसू कोसळले होते.

सोनाली आणि गोल्डी यांची प्रेमकथा खूपच रंजक आहे. त्यांचे पहिली भेट 1994 मध्ये एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. गोल्डीने प्रपोज केल्यानंतर सोनालीने सुरुवातीला नकार दिला होता. पण गोल्डी तिच्यावर प्रचंड प्रेम करत असल्याची तिला जाणीव झाली. त्यानंतर 1998 मध्ये गोल्डीने एका पार्टीत सगळ्यांसमोर गुडघ्यावर बसून सोनालीला प्रपोज केले होते. चार वर्षांच्या अफेअरनंतर त्यांनी 12 नोव्हेंबर 2002 मध्ये लग्न केले.


 

Web Title: When Shoaib Akhtar wanted to kidnap Sonali Bendre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.