पत्नीने प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रंगेहात पकडले होते संजय दत्तला, पाठलाग करत पोहोचली होती हॉटेलवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 10:29 PM2021-03-11T22:29:05+5:302021-03-11T22:39:55+5:30

Sanjay Dutt Affair: संजय आणि मान्यताला दोन मुलं असून शाहरान आणि इकारा अशी त्यांची नावं आहेत. याशिवाय पहिली पत्नी रिचा शर्मापासून त्याला एक मुलगी आहे जिचं नाव त्रिशाला आहे.

When Sanjay Dutt And Sushmita Sen Were Caught Red-handed By Riya Pillai | पत्नीने प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रंगेहात पकडले होते संजय दत्तला, पाठलाग करत पोहोचली होती हॉटेलवर

पत्नीने प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रंगेहात पकडले होते संजय दत्तला, पाठलाग करत पोहोचली होती हॉटेलवर

Next

बॉलिवूडचा मुन्नाभाईचे फिल्मी करिअरपेक्षा खासगी आयुष्यच जास्त वादग्रस्त राहिले. अनेकदा संजय दत्तच्या खासगी जीवनातील रंजक गोष्टींची चर्चा होत असते. तर कधी कधी स्वतः संजय दत्त त्याच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी चाहत्यांसह शेअर करत असतो. त्यामुळे संजय दत्तच्या सगळ्या घडामोडी त्याचे चाहते जाणून आहेत. संजय दत्तच्या खासगी जीवनात त्याचे नाव टीना मुनीम, माधुरी दीक्षित यांच्यासह जोडलं गेले. या को-स्टारसह त्याच्या अफेअरच्या चर्चा ब-याच रंगल्या होत्या. 


तर 'संजू' या बायोपिकमधू संजय दत्तला ३०८ गर्लफ्रेंड असल्याचेही सांगण्यात आले होते. मुळात लग्नानंतरही संजय दत्तचे एक्स्ट्रा मॅरिटिअल अफेअर सुरु होते. संजय दत्त आणि अभिनेत्री सुश्मिता सेन यांच्या अफेअरच्या चर्चाही त्यावेळी बॉलिवूडमध्ये जोरदार रंगल्या. सुश्मितासह अफेअर सुरु असताना तो विवाहीत होता.  रिया पिल्लईसह त्यावेळी त्याचे लग्न झाले होते. 

सुश्मितासह असलेले अफेअर रियाच्याही कानावर आले होते. अनेकदा रियाने संजय दत्तवर संशयही घेतला मात्र केवळ ऐकीव गोष्टींवर कितपत विश्वास ठेवावा हाच प्रश्न तिला सतावात होता. एकदा संजय दत्तचा पाठलाग करत ती एका हॉटेलमध्ये पोहचली होती. त्यावेळी हॉटेलच्या रुममध्ये सुश्मितासह संजय दत्तला तिने रंगेहाथ पकडले आणि अफेअरच्या चर्चा अफवा नसल्याचे तिला पटले. या अफेअरमुळे रिया पिल्लईने संजय दत्तसह वेगळे होण्याचा निर्णय घेतला. संजय दत्त आणि रिया पिल्लईनं २००८ मध्ये  घटस्फोट घेतला. 

रिया पिल्लई नंतर संजय दत्त पुन्हा एकदा प्रेमात पडला. संजय दत्त जिच्या प्रेमात पडला ती होती मान्यता दत्त. मान्यता दत्तसह लग्न करत त्याने संसार थाटला आजपर्यंत दोघांचा सुखाने संसार सुरु आहे. संजय दत्त आज मॅरिड लाईफ एन्जॉय करत त्याचे श्रेय तो मान्यता दत्तलाच देतो.

संजय आणि मान्यताला दोन मुलं असून शाहरान आणि इकारा अशी त्यांची नावं आहेत. याशिवाय पहिली पत्नी रिचा शर्मापासून त्याला एक मुलगी आहे जिचं नाव त्रिशाला आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: When Sanjay Dutt And Sushmita Sen Were Caught Red-handed By Riya Pillai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app