जेव्हा रणबीर कपूरसोबत कतरिना कैफला बिकनीत पाहून खूप संतापला होता सलमान खान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 05:16 PM2021-04-14T17:16:42+5:302021-04-14T17:17:24+5:30

एकेकाळी रणबीर आणि कतरिनाच्या प्रायव्हेट व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

When Salman Khan was very angry to see Katrina Kaif in a bikini with Ranbir Kapoor | जेव्हा रणबीर कपूरसोबत कतरिना कैफला बिकनीत पाहून खूप संतापला होता सलमान खान

जेव्हा रणबीर कपूरसोबत कतरिना कैफला बिकनीत पाहून खूप संतापला होता सलमान खान

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आज भलेही आलिया भटला डेट करतो आहे पण एक वेळ असा होता जेव्हा तो आणि कतरिना कैफ यांच्या अफेयरच्या खूप चर्चा ऐकायला मिळत असे. रणबीर कपूर आणि कतरिना कैफ एकत्र परदेशात व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेले होते. त्यावेळी रणबीर आणि कतरिनाच्या प्रायव्हेट व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर कपूर आणि कतरिना कैफच्या या फोटोंवर मीडियाने सलमान खानची प्रतिक्रिया जाणून घेताना तो खूप संतापला होता. तेव्हा दबंग खान म्हणाला होता की, त्याला कतरिना कैफचा हा फोटो मॉर्फ्ड आहे. तो म्हणाला होता की, कुणी सुट्टीवर गेले आहे आणि अशारितीने त्यांचे फोटो क्लिक करणे चुकीचे आहे. हे तुमच्या आई आणि बहिणीसोबतही होऊ शकते. सलमानने मीडियाशी बोलताना सांगितले होते की, जर तुमच्या कुटुंबाचे फोटो अशा पद्धतीने सार्वजनिक झाले तर तुम्हाला कसे वाटेल?


रणबीर आणि कतरिना हॉलिडेला इबिजा (स्पेन)ला गेली होती त्यावेळी कोणत्या तरी फोटोग्राफरने त्यांचे फोटो क्लिक केले होते जे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोवर रणबीर आणि कतरिनानेही आक्षेप घेतला होता आणि म्हटले होते की त्यांच्या प्रायव्हेसीची काळजी घ्यावी.


रणबीर कपूर आणि कतरिना कैफ ६ वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले होते. त्यानंतर आता कतरिना कैफचे नाव विकी कौशलसोबत चर्चेत येत आहे.

Web Title: When Salman Khan was very angry to see Katrina Kaif in a bikini with Ranbir Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.