काटा लगा गर्लबरोबर अशा अवस्थेत आढळला होता सलमान खान, या व्यक्तीने पकडले होते रंगेहाथ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 09:58 AM2019-11-01T09:58:38+5:302019-11-01T10:05:37+5:30

शेफालीच्या एंट्रीचा एक प्रोमो व्हिडीओही समोर आला आहे. सुरुवातीला तिला सिक्रेट रूममध्ये ठेवण्यात येणार आहे.

When Salman Khan Enjoys with shefali jariwala on bed In Mujhse Shaadi Karogi Movie | काटा लगा गर्लबरोबर अशा अवस्थेत आढळला होता सलमान खान, या व्यक्तीने पकडले होते रंगेहाथ

काटा लगा गर्लबरोबर अशा अवस्थेत आढळला होता सलमान खान, या व्यक्तीने पकडले होते रंगेहाथ

googlenewsNext

दिवसेंदिवस बिग बॉसमध्ये आणखीनच नवीन घडामोडी पाहायला मिळत आहेत. आता आणखीन एक ट्वीस्ट या शोमध्ये पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे १६ वर्षांपूर्वी म्हणजे २००२ मध्ये ‘कांटा लगा’ या गाण्याने एकच धूम केली होती. या गाण्याने शेफाली जरीवाला एका रात्रीत स्टार झाली होती. यानंतर २००४ मध्ये ‘मुझसे शादी करोगी’ या सिनेमात ती बिजलीची भूमिका साकारताना दिसली होती. शेफाली जरीवाला लवकरच बिग बॉस शोमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री करणार आहे. शेफालीच्या एंट्रीचा एक प्रोमो व्हिडीओही समोर आला आहे. सुरुवातीला तिला सिक्रेट रूममध्ये ठेवण्यात येणार आहे. 



बिग बॉसमध्ये शेफालीची एंट्री होणार म्हटल्यावर सध्या तिच्यावर जोरदार चर्चा रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे  सलमान आणि शेफालीचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायर झाला आहे. हा व्हिडीओ 'मुझसे शादी करोगी' सिनेमातला आहे. सलमान खानसह, अक्षय कुमार, प्रियंका चोप्रा यांचा प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमाने रसिकांचे भरघोस मनोरंजन केले होते. यात शेफाली छोट्याशा भूमिकेत झळकली होती.


सिनेमातल्या एका बेडसीनमुळे शेफालीने सा-यांचे लक्ष वेधले होते. या सीनमुळे हा सिनेमा तुफान चर्चेत आला होता.सलमान आणि शेफाली एकाच बेडवर झोपलेले असतात असा तो सिन होता. यांत सलमानला आपल्याच बेडवर झोपल्याचे बघताच तिचा थरकाप उडतो. त्याचवेळी प्रियंका सलमानला अशा अवस्थेत सलमानला बघते बघते आणि अपसेट होते असा तो सीन होता. लव्ह ट्रायंगल असलेल्या या सिनेमातलाहा सीन आता बिग बॉसच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुफान व्हायरल झाला आहे. 

Web Title: When Salman Khan Enjoys with shefali jariwala on bed In Mujhse Shaadi Karogi Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.