सोहेल खानची ती अवस्था पाहून सलमान खानला फुटला होता घाम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 06:00 AM2019-05-30T06:00:00+5:302019-05-30T06:00:03+5:30

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात सलमान खानने आपल्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला.

When Salman and Arbaz Khan feared facing their family revealed on The Kapil Sharma Show | सोहेल खानची ती अवस्था पाहून सलमान खानला फुटला होता घाम

सोहेल खानची ती अवस्था पाहून सलमान खानला फुटला होता घाम

googlenewsNext
ठळक मुद्देमी, अरबाज आणि सोहेल तिघेही ‘टारझन’ चित्रपट बघत होतो आणि एकीकडे दगडांनी काही तरी खेळ खेळत होतो. मी खेळात इतका रंगलो होतो की मी नकळतपणे सोहेलकडे एक दगड फेकला. तो दगड त्याला जोरात लागला.

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी देखील आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. त्यामुळे आता भारत या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान खान आणि कतरिना कैफ या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणेज सलमान खानचद कपिल शर्मा शोचा निर्माता आहे. त्यामुळे या कार्यक्रमात आपल्या चित्रपटाचे खूपच चांगले प्रमोशन तो करणार आहे. कपिल आणि त्याची टीम सलमान आणि कतरिनासोबत खूप साऱ्या गप्पा मारणार आहे. 


 
द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात सलमान खानने आपल्या लहानपणीचा एक गंमतीशीर किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकून उपस्थितांना हसू आवरत नव्हते. त्याने सांगितले की, “खूप वर्षांपूर्वी मी, अरबाज आणि सोहेल तिघेही ‘टारझन’ चित्रपट बघत होतो आणि एकीकडे दगडांनी काही तरी खेळ खेळत होतो. मी खेळात इतका रंगलो होतो की मी नकळतपणे सोहेलकडे एक दगड फेकला. तो दगड त्याला जोरात लागला... सोहेल त्यावेळी खूप लहान होता. काही क्षणातच त्याचे रक्त भळाभळा वाहायला लागले होते. त्याची ही अवस्था पाहून मी आणि अरबाज प्रचंड घाबरलो होतो. सोहेलला आमच्यामुळे इतके लागले याचे टेन्शन तर होते. पण आता हे कळल्यावर आमचे वडील आम्हाला किती ओरडणार याचे आम्हाला जास्त टेन्शन आले होते. 

कपिल शर्मा शो मध्ये सलमान आणि कतरिना आपल्या आयुष्यातील अनेक सिक्रेट शेअर करण्यासोबतच एक क्विझ देखील खेळणार आहेत. त्यात कतरिनाला कपिल सलमानबद्दल प्रश्न विचारणार आहे आणि तिला त्याच्याबद्दल किती माहिती आहे हे जाणून घेणार आहे. शिवाय कतरिना तिच्या ‘चिकनी चमेली’ सारख्या काही लोकप्रिय गाण्यांवर थिरकणार देखील आहे.


 
सलमानने काही दिवसांपूर्वी ट्विटरवर फोटो पोस्ट करत तो आणि कतरिना द कपिल शर्मा शो मध्ये येणार असल्याचे सांगितले होते. त्याने शेअर केलेल्या या फोटोत जीन्स, टी-शर्ट आणि जीन्स जॅकेटमध्ये तो हँडसम दिसत असून कतरिनाचे सौंदर्य साडीत खुलून आले आहे.



 

Web Title: When Salman and Arbaz Khan feared facing their family revealed on The Kapil Sharma Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.