VIDEO : मुंबईच्या बिझी रस्त्यावर रणवीरचा हृतिकच्या गाण्यावर डान्स, पण कुणाच्याही आलं नाही लक्षात....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 10:54 AM2020-12-16T10:54:43+5:302020-12-16T10:57:19+5:30

या व्हिडीओची खासियत म्हणजे रणवीर मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी भर रस्त्यात डान्स करताना दिसत आहे. पण त्याला डान्स होईपर्यंत कुणीही ओळखलं नाही.

When Ranveer Singh danced to Hrithik Roshan popular song in the middle of a busy road in Mumbai | VIDEO : मुंबईच्या बिझी रस्त्यावर रणवीरचा हृतिकच्या गाण्यावर डान्स, पण कुणाच्याही आलं नाही लक्षात....

VIDEO : मुंबईच्या बिझी रस्त्यावर रणवीरचा हृतिकच्या गाण्यावर डान्स, पण कुणाच्याही आलं नाही लक्षात....

googlenewsNext

रणवीर सिंहचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रणवीर सिंह हृतिक रोशनच्या 'मै ऐसा क्यूं हूं' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओची खासियत म्हणजे रणवीर मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी भर रस्त्यात डान्स करताना दिसत आहे. पण त्याला डान्स होईपर्यंत कुणीही ओळखलं नाही.

या व्हिडीओत बघू शकता की, रणवीर सिंह आपल्या गाडीतून उतरतो आणि रस्त्याच्या मधोमध म्युझिकसाठी सेटअप केल्यावर तिथेच डान्स करू लागतो. यात तो रणवीर हृतिकच्या क्रिशवाल्या अवतारात बघायला मिळत आहे. त्याने चेहऱ्यावर काळा मास्क लावला आहे. ज्यामुळे त्याला ओळखणं कठिण जातंय. 

रणवीर सिंह हा अभिनेता हृतिक रोशनचा मोठा फॅन आहे. हे चॅलेंज स्वत: हृतिक रोशनने रणवीर सिंहला दिलं होतं. 'बॅंग बॅंग' सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान हृतिकने सोशल मीडियावर रणवीरसाठी लिहिलं होतं की, त्याने कारमधून मुंबईच्या कोणत्याही मुख्य रस्त्यावर उतरावं आणि आपल्या फॅन्ससाठी पोज द्यावी'.

महत्वाची बाब म्हणजे हृतिकने हे चॅलेंज केवळ रणवीर सिंह यालाच नाही तर शाहरूख खान, प्रियांका चोप्रा, अर्जुन कपूर, श्रद्धा कपूर आणि आमीर खानसारख्या स्टार्सनाही दिलं होतं.
 

Web Title: When Ranveer Singh danced to Hrithik Roshan popular song in the middle of a busy road in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.