ठळक मुद्देकतरिना आणि सलमानची पहिली भेट ही सलमानची बहीण अलवीरामुळे झाली होती. कतरिना आणि अलवीरा या खूप चांगल्या फ्रेंड्स असून त्या दोघी अनेकवेळा एकत्र फिरायला जात असत.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांची जोडी बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्यांनी दोघांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. इतकेच नाही तर दोघांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना खूप आवडते. सलमान आणि कतरिना यांच्या आगामी चित्रपटाची नेहमीच त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहात असतात.

सलमान आणि कतरिना हे एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. ते दोघे लग्न करतील असे सगळ्यांना वाटत असतानाच त्यांनी ब्रेकअप केले. यामुळे त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. पण ब्रेकअपनंतरही सलमान आणि कतरिना यांची फ्रेंडशिप टिकून आहे. सलमानच्या कुटुंबियांसोबत देखील कतरिनाचे नाते खूपच चांगले आहे. कतरिना आणि सलमानची पहिली भेट कुठे झाली होती याविषयी कतरिनाने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले होते. कतरिना आणि सलमानची पहिली भेट ही खूपच इंटरेस्टिंग होती. त्या दोघांची पहिली भेट ही सलमानची बहीण अलवीरामुळे झाली होती. कतरिना आणि अलवीरा या खूप चांगल्या फ्रेंड्स असून त्या दोघी अनेकवेळा एकत्र फिरायला जात असत. 

कतरिनाने या भेटीविषयी एका मुलाखतीत सांगितले आहे की, सलमानला भेटण्यास मी खूप उत्सुक होते. त्याने त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीचे निमंत्रण अलवीराने मला दिले होते. पण या पार्टीला अलविराची कोणती मैत्रीण येणार याची कल्पना सलमानला नव्हती. मी त्याच्या घरी गेले, तेव्हा तो बाथरूममधून नुकताच बाहेर आला होता. घरातल्यांशिवाय कोणी या पार्टीला येणार हे त्याला माहीत नसल्याने तो शर्ट न घालताच बाथरूममधून बाहेर आला होता. त्याला पाहाताच मला हसू आवरले नाही. मला समोर पाहून कसे रिअ‍ॅक्ट करायचे हेच त्याला कळत नव्हते. त्यामुळे तो तसाच समोर उभा राहिला होता. 

कतरिना आणि सलमानची काहीच दिवसांत चांगली फ्रेंडशिप झाली  आणि सलमानने मैंने प्यार किया या चित्रपटात तिला काम करण्याची संधी दिली आणि याच चित्रपटामुळे कतरिनाच्या कारकिर्दीला एक वेगळे वळण मिळालं. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: When Katrina Kaif revealed how she met Salman Khan for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.