Video: जेव्हा कतरिना कैफला रडताना पाहून हैराण झाला होता सलमान, थांबवावं लागलं होतं शूटींग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 12:38 PM2021-12-08T12:38:13+5:302021-12-08T12:51:15+5:30

Katrina Kaif Crying : हा व्हिडीओ कतरिना कैफ सलमान खानसोबत 'टायगर जिंदा है'चं प्रमोशन करण्यासाठी एका रिअॅलिटी शोमध्ये पोहोचली होती.

When Katrina Kaif broke down on the sets of dance champions Salman Khan make her smile | Video: जेव्हा कतरिना कैफला रडताना पाहून हैराण झाला होता सलमान, थांबवावं लागलं होतं शूटींग

Video: जेव्हा कतरिना कैफला रडताना पाहून हैराण झाला होता सलमान, थांबवावं लागलं होतं शूटींग

googlenewsNext

कतरिना कैफ (Katrina Kaif) चा एक जुना व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओत ती सलमान खानसोबत (Salman Khan) दिसत आहे आणि तिच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याच नाव घेत नाहीयेत. हा इमोशनल व्हिडीओ तिच्या फॅन्सना पुन्हा एकदा इमोशनल करत आहे. यात कतरिना कैफला रडताना पाहून सलमान खानही तिच्याकडे केविलवाण्या नजरेने बघत आहे.

हा व्हिडीओ कतरिना कैफ सलमान खानसोबत 'टायगर जिंदा है'चं प्रमोशन करण्यासाठी एका रिअॅलिटी शोमध्ये पोहोचली होती. या शोवेळी सलमान खान आणि भूमिका चावलाचा सिनेमे 'तेरे नाम'मधील गाण्यावरील भावूक करणारा परफॉर्मन्स पाहिल्यावर कतरिनाच्या डोळ्यात अश्रू आले होते. ती बराच वेळ रडत होती. 

असं सांगितलं गेलं होतं की, कतरिना हा परफॉर्मन्स पाहून इतकी इमोशनल झाली होती की, शो चं शूटींग १० मिनिटांसाठी रोखण्यात आलं होतं. सलमान तिला रडताना पाहून म्हणाला होता की, उफ्फ रडू नको कतरिना. त्यानंतर त्याने आय हेट टिअर्स असा डायलॉग मारला होता.

कतरिनाला रडताना पाहून केवळ सलमानच नाही तर तिचे फॅन्सही खूप इमोशनल झाले होते. त्यानंतर कतरिनाला हसवण्यासाठी सलमान खान स्टेजवर पोहोचला होता आणि त्याने जग घूमिया गाण्यावर डान्सही केला होता.
 

Web Title: When Katrina Kaif broke down on the sets of dance champions Salman Khan make her smile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.