यामुळे कतरिनाचे धरले कार्तिक आर्यनने पाय, जाहीरपणे मागावी लागली माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 12:33 PM2020-03-05T12:33:18+5:302020-03-05T12:35:25+5:30

काही दिवसांपूर्वीच रणवीर सिंगलाही अशाच प्रकारे जाहीर माफी मागावी लागली होती.

When Kartik Aaryan arrived late for an event with Katrina Kaif and she made Him Apologise-SRJ | यामुळे कतरिनाचे धरले कार्तिक आर्यनने पाय, जाहीरपणे मागावी लागली माफी

यामुळे कतरिनाचे धरले कार्तिक आर्यनने पाय, जाहीरपणे मागावी लागली माफी

googlenewsNext

बॉलिवूडचा डॅशिंग अभिनेता कार्तिक आर्यन लाखो तरूणाईंच्या दिलों की धडकन बनलेला कार्तिकच्या प्रत्येक गोष्टीवर सारेच फिदा असतात. तो जे काही करतो त्या प्रत्येक गोष्टींवर चाहत्यांच्या नजरा नाही वळल्या तर नवलच. नुकत्याच आयफा पुरस्कारांच्या पत्रकार परिषदेतही सर्वांच्या नजरा कार्तिकवरच खिळून होत्या. या पत्रकार परिषदेला कतरिना कैफही आली होती. दोघांमध्ये असं काही झालं की उपस्थित फक्त पाहतच राहिले. कार्तिक या कार्यक्रमाला उशीरा पोहोचला. जेव्हा पत्रकार परिषद सुरू झाली तेव्हा कतरिना मस्करीत म्हणाली की, सर्वात आधी कार्तिक उशीरा आल्याबद्दल सर्वांची माफी मागणार आहे. कार्तिकनेही मनाचा मोठेपणा दाखवत क्षणाचाही विलंब न करता नुसती माफी नाही मागितली तर थेट कतरिना पायाच पडला. यासोबतच कान पकडून उठाबशाही त्याने  काढल्या.कार्तिकसाठी आणि उपस्थितांसाठी हे थोडे मजेशीर असले तरी यातून त्याने नक्कीच बोध घेत असला असणार हे मात्र नक्की.

काही दिवसांपूर्वीच रणवीर सिंगलाही अशाच प्रकारे जाहीर माफी मागावी लागली होती.सूर्यवंशीच्या ट्रेलर लाँचच्यावेळी असाच एक प्रकार घडला. ट्रेलर लाँच इव्हेंटच्या ठिकाणी अक्षय कुमार, अजय देवगण, रोहित शेट्टी, कतरिना कैफ आणि करण जोहर हजर होते. पण रणवीर सिंग उशीराने याठिकाणी पोहोचला.

 

मात्र शांतपणे येईल तो रणवीर सिंग कुठेला? या इव्हेंटच्या ठिकाणी रणवीर 40 मिनिटं उशीराने आला. येताच त्याने रोहित शेट्टीला मिठ्ठी मारली तर अक्षय, अजय, करण आणि कतरिनाला बघून लगेच उठाबशा काढायला सुरुवात केली. बंर आता तो इथेच थांबला नाही तर अक्षय आणि अजय आणि करण जोहराच्या जाऊन पायादेखील पडला.  त्यामुळे सध्या जो कोणी उशिरा येईल त्याला त्याच्या चुकीची जाणीव व्हावी यासाठी कतरिनानेच विडा उचलल्याचे पाहायला मिळते आहे. 

Web Title: When Kartik Aaryan arrived late for an event with Katrina Kaif and she made Him Apologise-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.