कंगना राणौत सेक्शुअली अ‍ॅक्टिव्ह आहे हे समजल्यावर अशी होती तिच्या पालकांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 10:25 AM2019-09-30T10:25:42+5:302019-09-30T10:38:13+5:30

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत म्हणजे बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री. मुद्दा कुठलाही असो कंगना अगदी परखड बोलते. साहजिकच या परखड बोलण्याने ती रोज नवे वाद ओढवून घेते. सध्या कंगना अशाच एका बोल्ड मुद्यावर बोल्ड मत मांडून चर्चेत आली आहे.

when kangana ranaut became sexually active her parents were shocked | कंगना राणौत सेक्शुअली अ‍ॅक्टिव्ह आहे हे समजल्यावर अशी होती तिच्या पालकांची प्रतिक्रिया

कंगना राणौत सेक्शुअली अ‍ॅक्टिव्ह आहे हे समजल्यावर अशी होती तिच्या पालकांची प्रतिक्रिया

googlenewsNext
ठळक मुद्दे कंगना लवकरच एकेकाळच्या तमिळ अभिनेत्री आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत म्हणजे बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री. मुद्दा कुठलाही असो कंगना अगदी परखड बोलते. साहजिकच या परखड बोलण्याने ती रोज नवे वाद ओढवून घेते. सध्या कंगना अशाच एका बोल्ड मुद्यावर बोल्ड मत मांडून चर्चेत आली आहे. होय, एका मीडिया समिटमध्ये कंगना अनेक बोल्ड मुद्यावर बोलली. यावेळी कंगनाला तिच्या रिलेशनशिपविषयी प्रश्न विचारण्यात आला आणि यावर बोलताना तिने  एक वेगळाच खुलासा केला. सेक्शुअली अ‍ॅक्टिव्ह असल्याचे कळल्यावर पालकांची काय प्रतिक्रिया होती, याचा खुलासा तिने केला. 


‘माझ्या आई-वडिलांना मी सेक्शुअली अ‍ॅक्टिव्हआहे, माझा सेक्शुअल पार्टनर आहे, हे कळल्यावर मोठा धक्का बसला होता,’असे तिने सांगितले. मुलांचे सेक्शुअल पार्टनर आहेत, हे कळल्यावर पालकांनी समजून घ्यायला हवे. याचा बाऊ करण्याऐवजी संतुलित सेक्स आणि प्रोटेक्शन याबद्दल आपल्या मुलांना माहिती द्यायला हवी, असेही ती म्हणाली.


सेक्शुअल पार्टनर बदलणे यावरही ती बोलली. सेक्शुअल पार्टनर बदलणे हे माझ्यामते, चुकीचे आहे. ही गोष्ट तुमची सिस्टीम बिघडवू शकते. याचे घातक परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. सध्या सेक्सबद्दलचे वेगवेगळे विचार आणि या सर्व गोष्टी मिळून एक अतिशय वाईट कॉकटेल तयार झाले आहे. तरूणाईने सुरक्षित सेक्सकडे लक्ष द्यायला हवे, असे तिने सांगितले. लैंगिक सुख हा आपल्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे. लैंगिक सुखाची गरज असेल तर ते करायला हवे. त्यात संकोचण्याचे कारण नाही. आपले पवित्र ग्रंथ सेक्स करण्याची परवानगी देत नाही, असे अनेक पालक मानतात. मात्र असे अजिबात नाही. अनेक ब्रह्मचारी व्यक्ती त्यांची सेक्शुअल एनर्जी अन्य दुस-या एनर्जीमध्ये बदलण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात, असेही तिने सांगितले.

 

Web Title: when kangana ranaut became sexually active her parents were shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.