Juhi Chawla Birthday: जुहीनं केलेला ‘तो’ अपमान सलमानच्या असा काही जिव्हारी लागला की त्यानं जणू शपथचं घेतली...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 08:00 AM2021-11-13T08:00:00+5:302021-11-13T08:00:07+5:30

Juhi Chawla Birthday: जुहीने जवळपास सर्व अभिनेत्यांसोबत काम केलं. अपवाद फक्त सलमान खानचा.

when juhi chawla rejected working with salman khan and chose aamir khan | Juhi Chawla Birthday: जुहीनं केलेला ‘तो’ अपमान सलमानच्या असा काही जिव्हारी लागला की त्यानं जणू शपथचं घेतली...!!

Juhi Chawla Birthday: जुहीनं केलेला ‘तो’ अपमान सलमानच्या असा काही जिव्हारी लागला की त्यानं जणू शपथचं घेतली...!!

googlenewsNext

90 च्या दशकात चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे जुही चावला. आज जुहीचा वाढदिवस (Juhi Chawla Birthday ). जुहीने जवळपास सर्व अभिनेत्यांसोबत काम केलं. अपवाद फक्त सलमान खानचा (Salman Khan). होय, जुहीचा एक अपमान सलमानच्या इतक्या जिव्हारी लागला की, त्यानं थेट जुहीसोबत आयुष्यात कधीच काम न करण्याचा निर्णय घेतला.

‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटानंतर जुही मोठी स्टार झाली होती. तिच्यासोबत काम करण्याचं प्रत्येकाचं स्वप्न होतं. सलमान खानही त्यापैकीचं एक. पण सलमानचे ‘ग्रह’ त्यावेळी फार काही चांगले नव्हते. लोकप्रियता कमी नव्हती. पण त्याचे चित्रपट फार काही चालत नव्हते. अर्थात तरीही निर्माते-दिग्दर्शक त्याला चित्रपटात घेण्यास उत्सुक होते. अशात एका दिग्दर्शकाला सलमान व जुही चावलाला घेऊन चित्रपट करायचा होता. या चित्रपटाची ऑफर घेऊन दिग्दर्शक मोठ्या आशेने जुहीकडे गेला होता. पण जुहीचे पाय कदाचित जमिनीवर नव्हते. तिने दिग्दर्शकाला बराच वेळ टांगणीवर ठेवले आणि नंतर एक दिवस अचानक चित्रपटाला नकार कळवला. इतकंच नाही तर या चित्रपटात सलमानऐवजी आमिर खानला द्या, असा सल्लाही तिने या दिग्दर्शकाला दिला. दिग्दर्शकाला मात्र सलमान व जुही हीच जोडी हवी होती. चर्चा फिस्कटली आणि जुही व सलमानला सोबत घेऊन चित्रपट काढण्याचा दिग्दर्शकाचा प्लानही फिस्कटला.

जुही ही गोष्ट लगेच विसरली. पण सलमान मात्र हा ‘अपमान’ कधीच विसरू शकला नाही. जुहीने आपल्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेऊन आपला अपमान केला, असा सलमानचा समज झाला. यानंतर काय तर जुहीसोबत भविष्यात कधीही काम न करण्याची जणू त्याने शपथचं घेतली.  त्याने कधीही जुही चावलासोबत काम केलं नाही.

डेव्हिड धवन, अनिल कपूर आणि गोविंदा यांनी केलेल्या विनंतीमुळे ‘दिवाना मस्ताना’ चित्रपटात सलमान जुहीसोबत काही सेकंदाचा एक सीन दिला, पण तो तेवढ्यापुरता. यानंतर सलमानने कधीच जुहीला भाव दिला नाही. आजही तो तिला जराही भाव देत नाही. 

2013 मध्ये जुही चावला आणि सलमान खान समोरासमोर आले. जुही सलमान खानच्या बिग बॉस या शोमध्ये गेस्ट म्हणून आली होती.

या शोमध्ये जुहीने सलमानला प्रश्न केला की, तु 90च्या दशकातील सगळ्या अभिनेत्रींसोबत काम केले. पण माझ्यासोबत तु कधीच काम केले नाही. यामागे काय कारण आहे? यावर सलमान खानने उत्तर दिले की, ‘मी तुझ्यासोबत काम करायला तयार होतो. पण तु माझ्यासोबत काम करायला नकार दिला. कारण तुला आमिर खानसोबत काम करायचे होते.’त्यावेळी जुहीला समजले की, तिने एकदा सलमान खानसोबत काम करायला नकार दिला. म्हणून सलमानने तिच्यासोबत परत कधीच काम केले नाही.  ‘बिग बॉस’च्या सेटवर  जुहीने सलमानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पण सलमानने काय तर तिला चक्क आईची भूमिका ऑफर केली. आईची भूमिका ऐकून जुही चांगलीच शॉक झाली होती.   

Web Title: when juhi chawla rejected working with salman khan and chose aamir khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.