रेखा यांच्यासोबत अफेअर होते का या प्रश्नावर अमिताभ बच्चन यांनी दिले होते हे उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 08:13 PM2021-01-08T20:13:19+5:302021-01-08T20:16:07+5:30

बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जीवनातील चर्चा रेखा यांच्या अफेयरशिवाय अपूर्ण आहे.

When Amitabh Bachchan give answer about the question of his affiar with rekha | रेखा यांच्यासोबत अफेअर होते का या प्रश्नावर अमिताभ बच्चन यांनी दिले होते हे उत्तर

रेखा यांच्यासोबत अफेअर होते का या प्रश्नावर अमिताभ बच्चन यांनी दिले होते हे उत्तर

googlenewsNext
ठळक मुद्देसिलसिला या चित्रपटात रेखा, जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांची तिकडी आपल्याला पाहायला मिळाली होती. या चित्रपटाच्यावेळी रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. या अफेअरच्या चर्चांवर अमिताभ यांनी मत एका मुलाखतीत व्यक्त केले होते.

अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरची नेहमीच मीडियात चर्चा रंगते. १९७३ ला  अमिताभ यांनी जया बच्चन यांच्यासोबत लग्न करत त्यांच्या चाहतींचे हृदय तोडले होते. त्यानंतर ऐंशीच्या दशकात रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरच्या चर्चांना ऊत आले. बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जीवनातील चर्चा रेखा यांच्या अफेयरशिवाय अपूर्ण आहे. अमिताभ बच्चन व रेखा यांचे अफेयर बॉलिवूडमधील सर्वात चर्चित अफेयरपैकी एक आहे. रेखा आणि अमिताभ बच्चन काही वर्षांनी वेगळे झाले. त्यानंतर ते एकमेकांच्या समोर येणेदेखील टाळायचे. त्या दोघांचे बरेच किस्से आहेत.

सिलसिला या चित्रपटात रेखा, जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांची तिकडी आपल्याला पाहायला मिळाली होती. या चित्रपटाच्यावेळी रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. या अफेअरच्या चर्चांवर अमिताभ यांनी त्यांचे मत एका मुलाखतीत व्यक्त केले होते. स्क्रोलचे पत्रकार करण थापर यांनी डेव्हिल्स एडव्होकेट-द अन्टोल्ट स्टोरीज या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे. 

करण यांनी पुस्तकात लिहिले आहे की, बच्चन यांच्या प्रतिक्षा या बंगल्यात अमिताभ यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही काही पत्रकार १९९२ मध्ये मुलाखत घ्यायला गेला होतो. मुलाखत मस्त रंगली होती. एका महिला पत्रकाराने त्यांना त्याच्या आयुष्यात असलेल्या महिलांविषयी विचारले. त्यानंतर करण थापर यांनी विचारले होते की, अनेक अभिनेत्रींसोबतचे तुमच्या अफेअरची मीडियात चर्चा रंगते. या स्टोरी खऱ्या असतात का? त्यावर मी पण अशा स्टोरी वाचतो. पण यात काहीही तथ्य नसते असं अमिताभ यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, या स्टोरी चुकीच्या असल्या तरी या छापण्यापासून मी कोणाला थांबवू शकत नाही. त्यावर रेखा यांच्याबद्दल काय? असे करण यांनी विचारले. त्यावर तिच्यासोबत देखील कधीच नाही असे अमिताभ यांनी लगेचच उत्तर दिले होते. 

Web Title: When Amitabh Bachchan give answer about the question of his affiar with rekha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.