ठळक मुद्देराजीव हा माझा केवळ एक चांगला मित्र होता, त्याशिवाय आमच्यात काहीही नव्हते. तुमच्या प्रेमकथेत उगाचच मला घुसवू नका असे मी त्याला ठणकावून सांगितले होते.

ऐश्वर्या राय आणि मनिषा कोईराला या दोघीही नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्या दोघींनीही त्या काळात एकाहून एक हिट चित्रपट दिले होते. ऐश्वर्या आणि मनिषा यांनी कधीच एकत्र काम केले नाही. पण त्या दोघींमध्ये प्रचंड भांडणं झाली होती. या भांडणाची चर्चा त्याकाळात प्रचंड रंगली होती. ही भांडणं कोणत्याही चित्रपटावरून नव्हे तर एक व्यक्तीमुळे झाली होती. ही व्यक्ती दुसरी कोणीही नसून राजीव मुलचंदानी होती. ऐश्वर्याने चिडून एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते.

ऐश्वर्या रायने बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याआधी तिचे राजीव मुलचंदानी या मॉडेलसोबत अफेअर असल्याचे म्हटले जात होते. पण ऐश्वर्याने ही गोष्ट कधीच मीडियात कबूल केली नव्हती. ही चर्चा होत असतानाच राजीव मनीषा कोईरालाच्या प्रेमात वेडा झाल्याने त्याने ऐश्वर्याला सोडले अशा चर्चांना देखील ऊत आले होते. 

पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, डिसेंबर १९९९ च्या शो टाईमच्या मासिकात या सगळ्या गोष्टीवर ऐश्वर्या रायने स्पष्टीकरण दिले होते. ती म्हणाली होती की, १९९४ मध्ये एका प्रसिद्ध मासिकाने एक बनावट कथा रचून लिहिली होती. राजीवने मनिषासाठी मला सोडले असा यात उल्लेख होता. हे वाचल्यावर मी राजीवला फोन करून हा काय प्रकार आहे असे विचारले होते. राजीव हा माझा केवळ एक चांगला मित्र होता, त्याशिवाय आमच्यात काहीही नव्हते. तुमच्या प्रेमकथेत उगाचच मला घुसवू नका असे मी त्याला ठणकावून सांगितले होते. दोन महिन्यातच त्यांचे नाते तुटले. मनिषा महिन्यांप्रमाणे प्रियकर बदलते. त्यामुळे मनिषावर या गोष्टींचा काहीही परिणाम झाला नसेल. पण या सगळ्या गोष्टींचा मला प्रचंड त्रास झाला होता. मी या घटनेमुळे कित्येक दिवस केवळ रडत होती. 

ऐश्वर्याची रायची ही मुलाखत त्या काळात चांगलीच गाजली होती. ती नेहमीच कॉन्ट्रोव्हर्सीपासून दूर राहाण्याचा प्रयत्न करते. पण या मुलाखतीत तिने दिलेल्या उत्तरातून ती मनिषावर किती चिडली होती हे सगळ्यांना कळले होते. 

Web Title: When Aishwarya Rai and Manisha Koirala got into a big fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.