'वेलकम' सिनेमातल्या 'या' अभिनेत्याची मुलगी दिसते फारच सुंदर, तरीही बॉलिवूडपासून आहे दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 11:07 PM2021-08-28T23:07:27+5:302021-08-28T23:17:45+5:30

करिअरसाठी तिने अभिनय नाही तर दुसऱ्या च क्षेत्रात आपले नाव कमावले आहे. लैला ही चित्रकार आहे. देश विदेशात पेंटीग्स विकल्या जातात.

Welcome movie's top villain Feroz khan real life daughter is so gorgeous, keeps herself far from limelight | 'वेलकम' सिनेमातल्या 'या' अभिनेत्याची मुलगी दिसते फारच सुंदर, तरीही बॉलिवूडपासून आहे दूर

'वेलकम' सिनेमातल्या 'या' अभिनेत्याची मुलगी दिसते फारच सुंदर, तरीही बॉलिवूडपासून आहे दूर

googlenewsNext

सध्या स्टारकिड्सचा जमाना आहे असे म्हटल्यास वावगं ठरु नये.बी-टाऊनमधल्या सेलिब्रेटींच्या मुलांनी आई- वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत रुपेरी पडद्यावर झळकले आहेत. आणखी स्टारकिड्स आगामी काळात रुपेरी पडद्यावर एंट्री करण्यासाठी सज्ज आहेत.  मात्र असेही काही स्टारकिड्स आहेत. ज्यांनी अभिनय क्षेत्रात करिअर न करता बॉलिवूडपासून दूरच राहणे पसंत केले.  

२००७ साली ‘वेलकम’ सिनेमाने रसिकांचे भरघोस मनोरंजन केले. सिनेमातल्या कलाकरांनी तर आपल्या विनोदाने धमाल उडवून दिली होती. अक्षय कुमार, कॅटरिना कैफ अनिल कपूर, नाना पाटेकर,परेश रावल, मल्लिका शेरावतह इतरही प्रसिद्ध चेहरे सिनेमात झळकले. यासह सिनेमात आर’डी’एक्सची भूमिका साकारली होती फिरोज खान यांनी.  आरडीएक्सच्या भूमिकेत फिरोज खान यांनी एकच धमाल उडवून दिली होती.

फिरोज खान खरतर हिरो बनण्यासाठी इंडस्ट्रीत आले होते. मात्र सहायक अभिनेता म्हणून ते समोर आले. १९६५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘ऊंचे लोग’ या सिनेमाने त्यांच्या करिअरला कलाटणी मिळाली.सिनेमा हिट ठरल्याने यशस्वी झाल्याने फिरोज खान यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती. इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी त्यांना जवळपास ८ वर्ष वाट पाहावी लागली होती.

 फिरोज खान यांच्याप्रमाणे त्यांच्या मुलीने मात्र बॉलिवूडमध्ये एंट्री केलीच नाही. फिरोज खान यांची मुलगी लैला खान सध्या चर्चेत आली आहे.करिअरसाठी तिने अभिनय नाही तर दुसऱ्या च क्षेत्रात आपले नाव कमावले आहे. लैला ही चित्रकार आहे. देश विदेशात पेंटीग्स विकल्या जातात. 

ती चित्रकार म्हणून प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर तिचे व्हायरल होणारे फोटो पाहून भल्या भल्यांची बोलती बंद होते इतकी ती सुंदर दिसते.  लैलाच नाही तर फिरोज खान यांच्या कुटुंबातली कोणतीच मुलगी सिनेसृष्टीत आलीच नाही. लैला दिसायलाही फार सुंदर आणि ग्लॅमरस आहे. सौंदर्याच्या बाबतीत ती बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही टक्कर देते. सुंदर दिसूनही ती बॉलिवूडमध्ये झळकलीच नाही.  फिरोज खानचा मुलगा फरदीन खाननेही बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले होते.

Web Title: Welcome movie's top villain Feroz khan real life daughter is so gorgeous, keeps herself far from limelight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.