नव्वदच्या दशकात बॉलिवूडमध्ये रोमँटिक चित्रपटांचा काळ होता. राजा हिंदुस्तानीपासून मोहरा असे अनेक सिनेमे प्रदर्शित झाले जे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहेत. 


९०च्या दशकातील फक्त चित्रपटच नाहीत तर गाणीदेखील रसिकांच्या लक्षात आहेत. मात्र यापेक्षाही हटके होतं ते नव्वदच्या दशकातील सेलेब्रेटींचं फोटोशूट. त्या काळातील फोटोशूट पाहून तुम्हाला हसू येईल.


या फोटोंमध्ये मिथुन व रेखा यांना पाहिल्यावर तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, की या दोघांनी हे काय परीधान केलं आहे. त्यांचा हा फोटो पाहून तुम्हाला हसू आवरलं नसेल ना. या फोटोतील पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मिथुन फार विचित्र दिसत आहेत.


तुम्ही कधी शाहरूख खानला बेबी बंपमध्ये पाहिले होते का? नाही ना... तर त्या काळात त्याने बेबी बंपमध्ये फोटोशूट केलं होतं. दुसऱ्या फोटोत जॉन दिसतोय, त्याचा हा गेटअप पाहून तुम्हाला हसायला आलं असेल ना.


अक्षय कुमारने असे का कपडे घातले असतील असा प्रश्न पडला असेल ना. तर बाजूच्या फोटोत गिफ्ट रॅपर परिधान केलेले गोविंदा व जुही यांना पाहून असे फोटोशूट करण्याची का वेळ आली असेल, असा प्रश्न पडला असेल ना.


जॅकी श्रॉफ यांची पोझ पाहून त्याला नेमकं काय करायचं होतं, असं फोटो पाहून वाटतंय ना. तर दुसऱ्या फोटो शक्ती कपूरची पोझ तर लाजवाब आहे. यापूर्वी त्याला अशा अवतारात कधी पाहिले नव्हते. 
 


Web Title: Weird ...! Shakti Kapoor's strange dress, Shahrukh's baby bump, this funny photo of celebrity
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.