प्रतीक्षा संपली! 'मिर्झापूर २' या तारखेला होणार रिलीज, कालीन भैय्या आणि गुड्डू पंडित घेणार सूड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 02:53 PM2020-08-24T14:53:33+5:302020-08-24T14:54:34+5:30

उत्तर भारतातील मिर्झापूर या भागात होणारे गुन्हे आणि गुन्हेजगतातील भयानक सत्य या सीरिजच्या पहिल्या भागात दाखविण्यात आले होते. त्यानंतर आता या सीरिजचा दुसरा भाग लवकरच भेटीला येतो आहे.

The wait is over! Release on 'Mirzapur 2', Kalin Bhaiya and Guddu Pandit to take revenge | प्रतीक्षा संपली! 'मिर्झापूर २' या तारखेला होणार रिलीज, कालीन भैय्या आणि गुड्डू पंडित घेणार सूड

प्रतीक्षा संपली! 'मिर्झापूर २' या तारखेला होणार रिलीज, कालीन भैय्या आणि गुड्डू पंडित घेणार सूड

googlenewsNext

उत्तर भारतातील मिर्झापूर या भागात होणारे गुन्हे आणि गुन्हेजगतातील भयानक सत्य या सीरिजच्या पहिल्या भागात दाखविण्यात आले होते. उत्तम पटकथा, संवाद आणि विषयाच्या उत्तम मांडणीमुळे प्रेक्षकांनी पहिल्या सिरीजला उत्तम प्रतिसाद दिला आणि त्याच विषयाला पुढे नेणारे 'मिर्झापूर'चे दुसरे पर्व अधिक रोमांचक आणि उत्तम बनले आहे. अमेझॉन प्राईम व्हिडीओवर 'मिर्झापूर २' ही सीरीज 23 ऑक्टोबर 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'मिर्झापूर २'मध्ये पंकज त्रिपाठी, अली फझल, दिव्येंदु, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुगल, हर्षिता शेखर गौर, अमित सियाल, अंजुम शर्मा , शिबा चड्डा, मनू ऋषी चड्डा आणि राजेश तेलंग यांसारख्या कलाकारांसोबतचा हा एक्शन पॅक प्रेक्षकांना आता ड्रग्स, ऍक्शन आणि जगण्यासाठीचा थरारक लढा याचा अनुभव देणार आहे. 'मिर्झापुर'च्या दुसऱ्या सिरीजमध्ये विजय वर्मा, प्रियांशु पेंयुली आणि ईशा तलवार दिसणार आहेत.


"एक्सेल एंटरटेनमेंटला उदंड प्रतिसाद आणि प्रेम मिळाले आहे. जेव्हाही आम्ही आपल्या सीमा आणि कक्षा रुंदावून एक उत्तम निर्मिती दिली आहे तेव्हा तेव्हा आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे." या प्रसंगी रितेश साधवानी, एक्सेल एंटरटेनमेंटचे निर्माते या सीरिजबद्दल बोलताना म्हणाले. "मिर्झापूर हा आमच्या कामाचा पुढचा टप्पा होता. भारतीय प्रेक्षकांना आम्ही अशा काही कथा दिल्यात ज्या खूप वेगळ्या आणि नवीन होत्या. भारतातील लहान सहान गावांमधून कधीही समोर न येणाऱ्या कथांना लोकांपर्यंत त्याचा अस्सलपणा टिकवून पोहचवणे हे आमच्यासाठी आव्हान होते मात्र आम्ही ते यशस्वीरीत्या पार पाडले.  या सीरिजला भारतातच नव्हे जगभरात उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळेच आम्हाला आणखी उत्तम काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे."


या सीरीजचे निर्माते एक्सेल एंटरटेनमेंट असून पुनीत कृष्णा यांनी ही सीरिज बनवली असून गुरमीत सिंग आणि मिहीर देसाई यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे.

Web Title: The wait is over! Release on 'Mirzapur 2', Kalin Bhaiya and Guddu Pandit to take revenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.