ठळक मुद्देवैजयंती माला यांचा गोल्फ खेळत असतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याच फोटोची सध्या चांगली रंगली आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंजी माला या अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्रापासून दूर असल्या तरी त्या अनेक सार्वजनिक कार्यक्रमात, पुरस्कार सोहळ्यांना हजेरी लावतात. तसेच या वयात देखील त्या भरतनाट्यम नृत्यावर थिरकताना दिसतात. त्यांच्या नृत्यावर त्यांचे चाहते चांगलेच फिदा आहेत. पण त्यांचे एक आगळेवेगळे रूप नुकतेच त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळाले. 

वैजयंती माला यांचा गोल्फ खेळत असतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याच फोटोची सध्या चांगली रंगली आहे. वैजयंती माला सध्या त्यांच्या कुटुंबियांसोबत दुबईत असून तिथेच त्यांना गोल्फ खेळाताना पाहाण्यात आले. त्यांनी अगदी प्रोफेशनल गोल्फ प्लेअरप्रमाणे कपडे परिधान केले होते. एवढेच नव्हे त्यांचा खेळ देखील अगदी प्रोफेशनल प्लेअरप्रमाणेच होता. 

वैजयंती माला यांचा हा फोटो त्यांच्या एका फॅनने ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केला असून हा फोटो त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. या फोटोला अनेक लाईक आणि कमेंट मिळाले आहेत.

देवदास, नया दौर, मधुमती, गंगा जमुना, लीडर, आम्रपाली, गंवार, लीडर, सुरज, संगम, पैगाम अशा अनेक चित्रपटात वैजयंती माला यांनी खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून भरतनाट्यमचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. वयाच्या 13 व्या वर्षी तामिळ सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली आणि 1951 मध्ये ‘बहार’ या सिनेमाद्वारे त्या हिंदी सिनेसृष्टीकडे वळल्या. पण त्यांना खरी ओळख दिली ती नागीन आणि देवदास या चित्रपटांनी.

डॉ. चमनलाल बाली यांच्यासोबत लग्न केल्यानंतर वैजयंती माला यांनी सिनेमात काम करणे बंद केले. 1969 मध्ये रिलीज झालेला ‘प्रिन्स’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता.

Web Title: Vyjayanti Mala seen playing golf like a trained golfer in Dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.