कमल हासन यांची मनधरणी अन् वैजयंतीमाला यांचा नम्र नकार!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 11:37 AM2018-07-23T11:37:21+5:302018-07-23T11:39:43+5:30

अनेकांनी वैजयंतीमाला यांना पुन्हा पडद्यावर आणण्याचे प्रयत्न करून पाहिलेत. पण सगळ्यांचेच प्रयत्न फसलेत

Vyjayanthimala has no such desire to comeback, Vyjayanthimala turns down Kamal Haasan | कमल हासन यांची मनधरणी अन् वैजयंतीमाला यांचा नम्र नकार!!

कमल हासन यांची मनधरणी अन् वैजयंतीमाला यांचा नम्र नकार!!

googlenewsNext

ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला यांनी आपला काळ अक्षरश: गाजवला. त्यांच्या नृत्यावर, त्यांच्या अभिनयावर, त्यांच्या अदांवर भाळणारे अनेक आहेत. १९७० मध्ये ‘गंवार’ या चित्रपटात वैजयंतीमाला राजेन्द्र कुमार यांच्यासोबत दिसल्या आणि त्यानंतर अचानक अभिनयसृष्टीला अलविदा म्हणत, इंडस्ट्रीतून बाहेर पडल्या. यानंतरच्या काळात अनेकांनी वैजयंतीमाला यांना पुन्हा पडद्यावर आणण्याचे प्रयत्न करून पाहिलेत. पण सगळ्यांचेच प्रयत्न फसलेत. वैजयंतीमाला सध्या ८१ वर्षांच्या आहेत. पण यावयातही त्यांच्याकडे सिनेमाचा प्रस्ताव घेऊन जाणारे अनेकजण आहेत. यातचे ताजे नाव म्हणजे, कमल हासन.

 होय, कमल हासन यांनी अगदी अलीकडे वैजयंतीमाला यांची यासाठी प्रचंड मनधरणी केली. आपल्या ‘विश्वरूपम2’ या चित्रपटात वैजयंतीमाला यांनी काम करावे, अशी कमल हासन यांची भरून इच्छा होती. हा प्रस्ताव घेऊन कमल हासन स्वत: वैजयंतीमाला यांच्याकडे गेले होते. ताज्या मुलाखतीत वैजयंतीमाला यांना याबाबत छेडले असता, त्यांनीही हे खरे असल्याचे सांगितले. ‘होय, कमल हासन माझ्या खूप मागे पडला होता. अगदी तो माझ्या घरीही आला. मी त्याचे स्वागत केले. पण त्याने मला चित्रपटात काम करण्याबद्दल विचारताच, मी त्याला नम्र नकार कळवला. कमल, मी खूप आधी अभिनय सोडला. आता मला तो निर्णय बदलायचा नाही. मला माफ कर, असे मी नम्रपणे त्याला सांगितले. साहजिकच, त्याला नकार देताना मलाही दु:ख झाले,’ असे वैजयंतीमाला यांनी सांगितले.
वैजयंतीमाला यांनी केवळ कमल हासन यांनाच नाही तर सुपरस्टार रजनीकांत यांनाही असाच नकार दिलेला आहे. वैजयंतीमाला त्यावरही बोलल्या़ ‘रजनीकांत माझा खूप जवळचा मित्र आहे. मी त्याचा खूप आदर करते. त्याने मला खूपदा चित्रपटांत काम करण्याबद्दल विचारले. या स्त्रीकडे बघा, पैसा या महिलेला अ‍ॅक्टिंगच्या दुनियेत परत आणू शकला नाही, असे एकदा खूप साऱ्या लोकांसमोर तो मला उद्देशून म्हणाला होता. माझ्या मते, तुम्ही तुमच्या तत्त्वांशी प्रामाणिक राहिलात तर लोकांच्या मनात तुम्ही आदरास पात्र ठरता,’असे त्या म्हणाल्या.

 

Web Title: Vyjayanthimala has no such desire to comeback, Vyjayanthimala turns down Kamal Haasan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.