विवेक ऑबेरॉयला ह्या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान झाली दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 01:30 PM2019-03-12T13:30:23+5:302019-03-12T13:32:51+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत बायोपिक 'पीएम नरेंद्र मोदी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मोदीच्या भूमिकेत अभिनेता विवेक ऑबेरॉय दिसणार आहे.

Vivek Oberoi was injured during shooting of this film | विवेक ऑबेरॉयला ह्या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान झाली दुखापत

विवेक ऑबेरॉयला ह्या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान झाली दुखापत

googlenewsNext

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत बायोपिक 'पीएम नरेंद्र मोदी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मोदीच्या भूमिकेत अभिनेता विवेक ऑबेरॉय दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याला दुखापत झाली आहे. त्यात त्याच्या पायाला गंभीर जखम झाली असून त्याच्या पायला टाके पडले आहेत. ही घटना घडली तेव्हा विवेक उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये चित्रीकरण करत होता. 

विवेक ऑबेरॉय हर्षिल धराली व गंगाच्या किनारी शूटिंग करत होता. त्यावेळी विवेक अनवाणी गंगा नदीच्या किनारी चालत होता. त्यावेळी त्याच्या पायात झाडाची टोकदार फांदी पायात घुसली. त्यामुळे त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यावेळी सेटवर डॉक्टर उपस्थित होते. जखम जास्त असल्यामुळे डॉक्टरांना टाके घालावे लागले. पायाला दुखापत झालेली असतानाही त्याने चित्रीकरण केले आणि त्यानंतर संपूर्ण टीम हर्षिलमधून देहरादूनसाठी रवाना झाले. उत्तराखंडमध्ये मोदी यांच्या सुरूवातीपासूनच्या जीवन प्रवासापासून राजकीय प्रवासांचे दृश्य चित्रीत केले जात आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये मोदींच्या भूमिकेत विवेक ऑबेरॉय दिसणार आहे. तर अमित शाह यांच्या भूमिकेत अभिनेता मनोज जोशी तर मोदींची आई हिराबेनच्या भूमिकेत जरीना वहाब दिसणार आहे. त्यांची पत्नी जशोदाबेन यांची भूमिका अभिनेत्री बरखा बिष्ट सेनगुप्ता निभावणार आहे.



 

या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार करत आहेत. नरेंद्र मोदी यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Vivek Oberoi was injured during shooting of this film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.