Vivek Oberoi just shared an 'exit poll' meme and it involves Aishwarya Rai Bachchan, Salman Khan and Abhishek | OMG! विवेक ओबेरॉयने उडवली ऐश्वर्या रायची खिल्ली! लोकांनी विचारले, तुला झाले तरी काय?
OMG! विवेक ओबेरॉयने उडवली ऐश्वर्या रायची खिल्ली! लोकांनी विचारले, तुला झाले तरी काय?

ठळक मुद्देविवेकने केलेल्या ट्वीटनंतर त्याचीही खिल्ली उडवली जातेय.

येत्या २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी निकालांचे एक्झिट पोल जाहीर झालेत. लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार सत्तेवर येईल, असे रविवारी प्रसिद्ध झालेल्या विविध एक्झिट पोलमध्ये म्हटले गेले. साहजिकच एक्झिट पोलच्या या निकालानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला. विरोधकांची, एक्झिट पोलची खिल्ली उडवणारे अनेक मीम्स शेअर केले गेलेत. अभिनेता विवेक ओबेरॉय हाही याला अपवाद नाही.
विवेकने आपल्या सोशल अकाऊंटवर एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवरचे एक मीम शेअर केले. पण त्याचे हे ट्वीट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण हे ट्वीट आणि हे मीम शेअर करताना त्याने केवळ एक्झिट पोलचीच नाही तर ऐश्वर्या राय बच्चन हिचीही खिल्ली उडवली. विवेकने ट्वीट केलेल्या मीम्समध्ये तीन फोटो आहेत. यातील पहिल्या सर्वात वरच्या फोटोत सलमान खान आणि ऐश्वर्या राय दिसतेय. या फोटोला ‘ओपिनियन पोल’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. दुसऱ्या फोटोत ऐश्वर्या विवेक ओबेरॉयसोबत आहे. यावर ‘एक्झिट पोल’ असे लिहिलेले आहे. तिसºया फोटोत ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन व आराध्याचा फोटो आहे आणि यावर ‘रिझल्ट’ असे लिहिले आहे.
विवेकने हे मीम शेअर करताना त्यासोबत लॉफिंग इमोजी पोस्ट केले आहेत. सोबत, ‘नो पॉलिटिक्स हिअर, जस्ट लाईफ’ असे लिहिले आहे.
विवेकने असे का करावे आणि ऐश्वर्या रायचेच मीम का निवडावे, हाच प्रश्न सध्या चाहतांना पडला आहे. विवेक यावर काय उत्तर देतो, ते बघूच. तूर्तास विवेकने केलेल्या ट्वीटनंतर त्याचीही खिल्ली उडवली जातेय. 


Web Title: Vivek Oberoi just shared an 'exit poll' meme and it involves Aishwarya Rai Bachchan, Salman Khan and Abhishek
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.