Super Cute! काकाने शेअर केला ‘विरूष्का’च्या लेकीचा पहिला फोटो, नाव ठेवले...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 10:25 AM2021-01-12T10:25:41+5:302021-01-12T10:27:25+5:30

होय विराटचा भाऊ  विकास कोहली याने सोशल मीडियावर कोहली कुटुंबातील या ‘लक्ष्मी’चा पहिला फोटो शेअर केला.

Virat Kohli's brother Vikas Kohli shares the first picture of Anushka Sharma's newborn baby girl | Super Cute! काकाने शेअर केला ‘विरूष्का’च्या लेकीचा पहिला फोटो, नाव ठेवले...!!

Super Cute! काकाने शेअर केला ‘विरूष्का’च्या लेकीचा पहिला फोटो, नाव ठेवले...!!

googlenewsNext
ठळक मुद्देसोमवारी दुपारी विराटने मुलीच्या जन्माची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती.

विरूष्काच्या अर्थात विराट कोहलीअनुष्का शर्माच्या घरी कन्यारत्न जन्मले. तूर्तास क्रीडा विश्वापासून ते अगदी कलाविश्वापर्यंत विरूष्कावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होतोय. चाहत्यांनीही विरूष्काला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
सोमवारी दुपारी सुमारास विराटने मुलगी झाल्याचे जाहीर केले आणि   वघ्या काही क्षणांतच विरूष्का ट्रेंडमध्ये आले. आता विरूष्काच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी आणि तिचे नाव ऐकण्यासाठी चाहते आतूर झाले आहेत.  

अशात लाडक्या लेकीचा पहिलावहिला फोटो सोशल मीडियावर शेअर झाला आला. होय विराटचा भाऊ  विकास कोहली याने सोशल मीडियावर कोहली कुटुंबातील या ‘लक्ष्मी’चा पहिला फोटो शेअर केला. फोटोत तिचा चेहरा दिसत नाही तर फक्त इवलीशी पावलं तेवढी दिसतात.  पांढ-या शुभ्र कापडावर भाचीची इवलीशी पावलं आणि सोबत तिचे स्वागत करणारी  कार्टून पात्र असा एक काही सेकंदांचा व्हिडीओवजा फोटो त्याने पोस्ट केला आहे. 

विराटची बहीण भावना कोहली धिंग्रा, हिनेही आत्या झाल्याचा आनंद व्यक्त करत, विरूष्काच्या लेकीचे या जगात स्वागत केले आहे.  

नाव ठेवले अन्वी?

अनुष्का व विराट यांनी आपल्या लेकीचे नाव अन्वी ठेवल्याचे कळतेय. अनुष्का आणि विराट या नावाला मिळून अन्वी असे नामकरण करण्यात आल्याचे कळतेय. अर्थात अद्याप विरूष्काने अद्याप अधिकृतपणे तिच्या नावाची घोषणा केलेली नाही. अन्वी म्हणजे लक्ष्मी. विरूष्काच्या घरात लक्ष्मी आली आहे आणि त्याअर्थाने हे नाव अगदीच समर्पक आहे.
सोमवारी दुपारी विराटने मुलीच्या जन्माची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. ‘ तुम्हा सर्वांना सांगण्यात आनंद होतोय, की आज दुपारीच आम्हाला एक कन्यारत्न झाले. तुम्हा सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि प्रार्थनांसाठी मी आभारी आहे. अनुष्का आणि बाळ दोघीही सुदृढ आहेत. आम्ही या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी स्वत:ला नशीबवान समजतो. तूर्तास तुम्हीही  आमच्या गोपनीयतेचा आदर कराल अशी  आशा करतो’, असे या पोस्टमध्ये त्याने लिहिले होते.

Web Title: Virat Kohli's brother Vikas Kohli shares the first picture of Anushka Sharma's newborn baby girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.