Video : सुष्मिता सेनचा बॉयफ्रेन्ड रोहमनसोबतचा खास व्हिडीओ व्हायरल, लोक करत आहेत त्याचं कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 01:31 PM2020-08-25T13:31:10+5:302020-08-25T14:01:16+5:30

सुष्मिता सेन सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव असते. ती तिचे आणि फॅमिलीचे फोटो सतत शेअर करत असते. नुकतेच रोहमन आणि सुष्मिता सेन घराबाहेर स्पॉट झाले होते.

Viral Video : Rohman Shawl snapped carrying bag of Sushmita Sen | Video : सुष्मिता सेनचा बॉयफ्रेन्ड रोहमनसोबतचा खास व्हिडीओ व्हायरल, लोक करत आहेत त्याचं कौतुक!

Video : सुष्मिता सेनचा बॉयफ्रेन्ड रोहमनसोबतचा खास व्हिडीओ व्हायरल, लोक करत आहेत त्याचं कौतुक!

googlenewsNext

सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल जेव्हा सोबत असतात तेव्हा त्यांची केमिस्ट्री बघण्यासारखी असते हे दाखवणारे अनेक फोटो याआधी समोर आलेले आहेत. त्यांचा असाच एक दोघातील केमिस्ट्री दाखवणारा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरलाय आणि व्हायरल झालाय. हा व्हिडीओत सुष्मिताच्या घराबाहेरचा आहे. पण जे लोकांनी पाहिलं त्याचं लोक भरभरून कौतुक करत आहेत. 

सुष्मिता सेन सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव असते. ती तिचे आणि फॅमिलीचे फोटो सतत शेअर करत असते. नुकतेच रोहमन आणि सुष्मिता सेन घराबाहेर स्पॉट झाले होते. सुष्मिता नुकतीच गाडीतून उरते आणि रोहमन तिचा बॅग कॅरी करताना दिसतो. दरम्यान तिच्या घरासमोर उभे असलेले फोटोग्राफर्स सुष्मिताकडे फोटोची मागणी करतात तर ते दोघे खास पोज देतात. सुष्मिता रोहमनच्या गळ्यात हात घालते आणि छानशी स्माइल देते. सोशल मीडिया यूजर रोहमनचं भरभरून कौतुक करत आहेत. सुष्मिताची बॅग कॅरी करण्यासाठी त्याला जेंटलमेन म्हणत आहेत.

सुष्मिता रोहमनसोबतचे वर्कआउट करतानाचे फोटो नेहमीच शेअर करत असते. तर रोहमन आणि सुष्मिताच्या मुलींचं बॉन्डींगही सोशल मीडियातील फोटोतून आणि व्हिडीओतून बघायला मिळतं. सुष्मिताच्या कामाबाबत सांगायचं तर मोठ्या ब्रेकनंतर तिने स्क्रीनवर रिन्ट्री घेतली आहे. आर्यातील तिच्या कामाचं प्रेक्षकांकडून कौतुक केलं जातंय.

दरम्यान, दोघांच्या लग्नाबाबत नेहमीच चर्चा सुरू असतात. असे सांगितले जात होते की दोघेही डिसेंबर २०१९ मध्ये लग्न करणार आहेत. पण भावाच्या लग्नामुळे सुष्मिताने तिच्या लग्नाची डेट पुढे ढकलली. आता कोरोनामुळे तिचं लग्न आणखी लांबलं. आता दोघे २०२१ मध्ये लग्न करणार अशी चर्चा आहे. दोघांमधील वयाच्या अंतराचीही नेहमीच चर्चा होत असते. रोहमन हा सुष्मितापेक्षा १६ वर्षांनी लहान आहे. 

VIDEO : जूही चावलाचा जुना व्हिडीओ व्हायरल, मिस यूनिव्हर्स स्पर्धेत असा दाखवला होता जलवा!

‘मिस्ट्री गर्ल’? आता मात्र अती झाले... !  फरहान अख्तरची गर्लफ्रेन्ड शिबानी भडकली 

कॅन्सरवरील उपचारासाठी संजूबाबा जाणार अमेरिकेला, आई नर्गिसवर उपचार झालेल्या हॉस्पिटलमध्ये होणार दाखल ?

Web Title: Viral Video : Rohman Shawl snapped carrying bag of Sushmita Sen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.