‘द फॅमिली मॅन 2’वर 'मीम्स'चा पाऊस, हे नाही पाहिले तर मग काय पाहिलं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 12:04 PM2021-06-11T12:04:11+5:302021-06-11T12:06:14+5:30

The Family Man 2 Memes : सध्या सोशल मीडियावर काय तर ‘द फॅमिली मॅन 2’चीच चर्चा पाहायला मिळतेय. केवळ सीरिज नाही तर या सीरिजवरचे मीम्सही सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

viral memes on social media about Manoj Bajpayee and Samantha Akkineni starrer family man 2 | ‘द फॅमिली मॅन 2’वर 'मीम्स'चा पाऊस, हे नाही पाहिले तर मग काय पाहिलं? 

‘द फॅमिली मॅन 2’वर 'मीम्स'चा पाऊस, हे नाही पाहिले तर मग काय पाहिलं? 

googlenewsNext
ठळक मुद्देमनोज वाजपेयीने ‘द फॅमिली मॅन 2’मध्ये श्रीकांतची व्यक्तिरेखा साकारली आहे. या सीरिजमधील मनोजच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले.

अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून ‘द फॅमिली मॅन 2’ ((The Family Man 2) ही सीरिज अखेर रिलीज झाली. आधी ‘तांडव’ या सीरिजवरून झालेल्या वादामुळे ‘द फॅमिली मॅन 2’ काहीसा रखडला. यानंतर ट्रेलर रिलीज होताच ‘द फॅमिली मॅन 2’नेही वाद ओढवून घेतला. हे अडथळे पार करत सीरिज अखेर रिलीज झाली आणि या सीरिजने इंटरनेटवर अक्षरश: धुमाकूळ घातला. ‘द फॅमिली मॅन ’पहिला सीझन लोकांना प्रचंड आवडला होता. त्यामुळे दुसरा सीझन कधी एकदा येतो, याची चाहते वाट पाहत होते. साहजिकच दुसरा सीझन रिलीज झाला आणि त्यावर लोकांच्या उड्या पडल्या. सध्या सोशल मीडियावर काय तर ‘द फॅमिली मॅन 2’चीच चर्चा पाहायला मिळतेय. केवळ सीरिज नाही तर या सीरिजवरचे मीम्सही सध्या तुफान व्हायरल होत आहेत. (The Family Man 2 Memes)

आयटी फर्मच्या बॉसला श्रीकांत अर्थात मनोज वाजपेयी दम देतो तो सीन, चेल्लम नावाचे एक भन्नाट पात्र शिवाय सीरिजमधील तामिळ संवाद यावरचे अनेक कल्पक आणि हसून हसून पोट दुखेन असे मीम्स सध्या सोशल मीडियावर दिसत आहेत.
मीमकरी मंडळींनी एकापेक्षा एक भारी मीम तयार केले आहेत. इतके भारी की, ते पाहून मीमकरी मंडळींच्या क्रिएटीव्हिटीचा हेवा वाटावा इतके भारी. तेव्हा चला तर, पाहुया काही भन्नाट मीम्स..

‘द फॅमिली मॅन 2’मधील चेल्लम हे पात्र सध्या मीमकरी मंडळींनी डोक्यावर घेतले आहे. त्याच्यावरचे अनेक मीम्स तुम्हाला हसायला भाग पाडतील. हे चेल्लम नावाचे पात्र आपल्या गुगलबाबापेक्षा कमी नाही. त्यावरचे अनेक मीम्स सध्या व्हायरल होत आहेत.

‘द फॅमिली मॅन 2’मध्ये तामिळमधील अनेक संवाद आहे. यावरचेही मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

श्रीकांत आयटी फर्ममधील बॉसला दम देतो, हे पाहून अनेक आयटी फर्ममध्ये काम करणारे सुखावले असतील हे नक्की. तेव्हा याच्या वर  मीम्स तयार होणार नाहीत, हे शक्यच नाही..

मनोज वाजपेयीने ‘द फॅमिली मॅन 2’मध्ये श्रीकांतची व्यक्तिरेखा साकारली आहे. या सीरिजमधील मनोजच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. आता तो नेटफ्लिक्सच्या ‘रे’ या नव्या सीरिजमध्ये दिसणार आहे. ही सीरिज सत्यजीत रे यांच्या कथांवर आधारित आहे. मंगळवारी याचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला. यात मनोजशिवाय केके मनेन, अली फजल, हर्षवर्धन कपूर मुख्य भूमिकेत आहेत. या सीरिजमध्ये चार वेगवेगळी पात्र आणि चार वेगवेगळ्या कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

Web Title: viral memes on social media about Manoj Bajpayee and Samantha Akkineni starrer family man 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.